Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : सततच्या पावसाने पिकांचे नुकसान होण्याची चिन्हे

Weather Impact : वाशीम जिल्ह्यात यंदाच्या हंगामात गेले काही दिवस सतत पाऊस होत असल्याने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता तयार होऊ लागली.

Team Agrowon

Washim News : वाशीम जिल्ह्यात यंदाच्या हंगामात गेले काही दिवस सतत पाऊस होत असल्याने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता तयार होऊ लागली. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ५६९ मिलिमीटरच्या तुलनेत ६१९ मिलिमीटर म्हणजेच १०८ टक्के पाऊस झाला आहे. सतत, दिवसाआड पाऊस येत असल्याने काही ठिकाणी सोयाबीनचे पीक पिवळे पडते आहे.

वाशीम जिल्ह्यात कारंजा व रिसोड तालुके वगळता उर्वरित ठिकाणी १०० टक्क्यांवर पाऊस झाला. वाशीममध्ये ६६५ मिलिमीटर (१०१ टक्के), रिसोड ५४१ (९६ टक्के), मालेगाव ७६७ (१३७ टक्के), मंगरूळपीर ६६० (१२७ टक्के), मानोरा ५८२ (११३ टक्के) तर कारंजामध्ये ४९० (९० टक्के) पाऊस नोंद झालेली आहे.

मागील काही तासांपासून जिल्ह्यात विविध भागांत पाऊस सक्रिय झालेला आहे. प्रामुख्याने मंगरूळपीर तालुक्यात पाऊस अधिक प्रमाणात झाला. या तालुक्यात आसेगाव (२) मंडलात सर्वाधिक ४४.३ मिलिमीटर पाऊस पडला.

तर शेलू खुर्द २१ मिलिमीटर पाऊस पडला. अधूनमधून होत असलेल्या या पावसाने आता चिंतेत वाढ केली आहे. सोयाबीनचे पीक बहुतांश ठिकाणी फुलोरा, शेंगांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आलेले आहे.

अशा काळात सूर्यप्रकाशाची नितांत गरज असल्याचे शेतकरी बोलत आहे. असेच वातावरण कायम राहिले तर सोयाबीनच्या उत्पादकतेला मोठा फटका बसू शकतो. प्रामुख्याने सखल भागात साचलेल्या पाण्यामुळे ओलावा कायम राहत आहे. या ठिकाणी पिकांची मुळे कुजत आहेत. पीक पिवळे पडण्याचे प्रकार होत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed Drill Subsidy: हिंगणघाट बाजार समिती देणार अनुदानावर पेरणी यंत्र

Farmer Insurance App Issue: ॲप, टोल फ्री नंबरवर तक्रारीची नोंद होईना!

Avocado Farming Success: दिवे येथे अ‍ॅव्होकॅडो फळपीक उत्पादनाचा यशस्वी प्रयोग

Farmer Death: कसमादे पट्ट्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Sugar Industry Growth: साखर उद्योगाला चालना मिळणार

SCROLL FOR NEXT