Betel Nut Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Betel Nut : सुपारी पिकात मोठी फळगळ

Farmer Issue : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुपारी पिकाला फळगळीचे ग्रहण लागले आहे. सुपारीची कोवळी फळे गळून पडत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुपारी पिकाला फळगळीचे ग्रहण लागले आहे. सुपारीची कोवळी फळे गळून पडत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यांत ७० टक्क्यांपेक्षा अधिक फळगळीने नुकसान झाले आहे. कोळेरोग आणि बुरशीमुळे फळगळ होत असल्याचा सुपारी बागायतदारांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात या वर्षी ६ जुलै ते २० जुलै या कालावधीत सतत अतिवृष्टी झाली. त्यानंतर ऑगस्टमध्ये देखील पावसाचा जोर कायम राहिला. परंतु या कालावधीत सुपारी पिकांमध्ये फळगळ झालेली नाही.

परंतु १५ ऑगस्टनंतर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आणि ऊन पावसाचा खेळ सुरू झाला. त्यानंतर जिल्ह्यातील सुपारी पिकांवर कोळेरोग आणि बुरशीचा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात झाली. दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यांतील अनेक गावांमध्ये सुपारीची मोठी लागवड आहे. या गावांमध्ये ऑगस्ट अखेरपासून फळगळीला सुरुवात झाली.

शेतकऱ्यांनी फळगळ थांबण्यासाठी फवारण्यादेखील केल्या. परंतु त्याचा तितकासा परिणाम झाला नाही. सुपारीच्या झाडाखाली कोवळ्या फळांचा खच साचला आहे. झाडावरील ७० टक्के फळे जमिनीवर पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कीटकनाशक, बुरशीनाशकांचा कसलाही परिणाम होत नसल्याने शेतकऱ्यांची बैचेनी वाढली आहे.

माझी सुपारीची दीड हजाराहून अधिक झाडे आहेत. साधारणपणे ८०० ते १००० किलो उत्पादन अपेक्षित होते. परंतु ७० टक्के फळगळ झाली असून, आता केवळ ३०० ते ४०० किलो देखील उत्पादन मिळण्याची शाश्‍वती नाही.
दीपक गवस, झोळंबे, दोडामार्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer shortage : देशात खताचा साठा पुरेसा, केंद्र सरकारचा दावा; शेतकऱ्यांची मात्र खत टंचाईने कोंडी

Fruit Packaging: भारतीय फळनिहाय पॅकेजिंग पद्धती

Agriculture Minister: विद्यार्थी वसतिगृहाला कृषिमंत्र्याची अचानक भेट

Agriculture Land Document: महसूल, दिवाणी कोर्टासाठी फेरफार पत्रक

Citrus Farming: कागदी लिंबू हस्त बहराचे नियोजन

SCROLL FOR NEXT