Pune APMC Fruit Market Rates Summer Season: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या उन्हाळी फळांचा हंगाम सुरू आहे. या हंगामाबरोबरच रमजान सणाचा महिना व उपवास यांच्या पार्श्वभूमीवर फळांना मागणी वाढली आहे. त्यातच अमेरिका - इराण युद्धाची समस्या उद्भविल्याने फळांच्या आखाती देशांमधील निर्यातीवर झाला आहे. या अनुषंगाने पुणे बाजार समितीतील खरबूज, कलिंगड, द्राक्ष या फळांचा घेतलेला मार्केट आढावा..सध्या सर्वत्र उन्हाळी हंगामातील फळांचा हंगाम सुरू आहे. यातच रमजान सणाचा काळ सुरू असून, येत्या शनिवारी हा सण साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर फळांची मागणी असते. या बाजारातील कलिंगड खरबूज आवक आणि दरांबाबतची माहिती प्रमुख अडते नितीन कुंजीर आणि पांडुरंग सुपेकर यांनी दिली. ते म्हणाले, की रमजान महिन्यातील उपवास कडक असतात..या वेळी शरीरातील साखर आणि पाण्याचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी रसदार फळांना मागणी असते. यामध्ये प्रामुख्याने कलिंगड आणि खरबुजाचा समावेश असतो. अनेक शेतकरी रमजान काळातील मागणी लक्षात ओळखून फळांच्या लागवडीचे पूर्वनियोजन करतात. फळांची आवक बाजार समितीत साधारण फेब्रुवारी अखेरपासून सुरू होते. कलिंगड, खरबुजाची साधारण आवक पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड या तालुक्यांमधून; तसेच सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमधून होत असते..Fruit Market: गुणकारी आवळ्याला ग्राहकांची मागणी वाढली.काही प्रमाणात कर्नाटक राज्यातील हुबळी, बेळगाव परिसरातूनही पुणे बाजार समितीत फळे येतात. खरबूज व कलिंगडाचे अलीकडील काळात विविध वाण विकसित झाले आहेत. आकार, स्वाद, चव, गंध, रंग, रसाळपणा यानुसार त्यांत विविधता आली आहे. त्यादृष्टीने मागणी पाहून शेतकऱ्यांना वाण निवडीला पर्याय उपलब्ध झाले आहेत. भडक पिवळ्या रंगाच्या वाणाचीही बाजारात जास्त आवक होत आहे..ग्राहक या वैशिष्ट्यांनुसार फळांकडे आकर्षित होतात. काही वाणांची टिकवणक्षमता देखील जास्त असल्याने वाहतुकीमध्ये जास्त नुकसान होत नाही असे सुपेकर यांनी सांगितले. वैशिष्ट्यांनुसार किलोला दोन ते तीन रुपये प्रति दर अधिक मिळतात. हंगामाच्या प्रारंभी फेब्रुवारीमध्ये साधारण १० ते १२ टनांपासून होणारी या फळांची आवक ही रमझानचा महिना आणि मे अखेरपर्यंत दैनंदिन १०० टनांपर्यंत पोहोचते. या वेळी कलिंगडाला प्रति किलो १५ ते २५ रुपये, तर खरबुजाला २० ते ३५ रुपयांपर्यंत दर मिळतो..युद्धाचा असाही परिणामअमेरिका- इराण युद्धाचा थेट परिणाम कलिंगड, खरबूज, द्राक्षाच्या निर्यातीसह स्थानिक बाजारपेठेवर झाला आहे. रमजानच्या पार्श्वभूमीवर दुबईसह आखाती देशांमध्ये महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर कलिंगड, खरबूज, द्राक्षांची निर्यात होत असते. फेब्रुवारीअखेर ती सुरळीत होती. मात्र युद्ध सुरू झाल्यावर निर्यात थांबली. अनेक कंटेनर्स बंदरामध्ये अडकून पडले. पुढील खरेदी थांबल्याने निर्यातीसाठी न जाणारा शेतीमाल पुणे, मुंबई बाजार समितीमध्ये येऊ लागला. परिणामी, बाजारातील आवक वाढल्याने दर कमी होऊ लागले आहेत. अनेक वेळा बाजारात जास्त झालेल्या आवकेमुळे शेतीमाल उतरविण्यासाठी देखील अडचणी येत असल्याचे अडते कल्याण वदडे यांनी सांगितले..Fruit Export Impact: निर्यातयोग्य फळ स्थानिक बाजारात आल्याने दरावर परिणाम .द्राक्षाचा हंगाममागील वर्षी राज्यातील द्राक्षपट्ट्यात सर्वत्र सतत पाऊस होता. परिणामी, द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे बाजारात यंदा दरवर्षीच्या तुलनेने द्राक्षांचे प्रमाण कमी आहे. रमझानसाठी त्यांची देखील मागणी वाढली असून, उशिरा सुरू झालेला द्राक्षाचा हंगाम आता बहरला आहे. द्राक्षात गोडी उतरू लागल्याने आवक, मागणीसह दर देखील वाढल्याचे अडतदार अरविंद मोरे यांनी सांगितले. पंधरा किलोच्या क्रेटला सध्या ७०० ते १ हजार ५०० रुपयांचा दर मिळत आहे. .तर किरकोळ बाजारात १२० ते १८० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. बाजारात होणारी आवक ही सांगली तासगाव, इंदापूर, बारामती, नारायणगावसह नाशिक जिल्ह्यातून होत आहे. या वर्षी पाऊस लांबल्याने त्याचा परिणाम हंगामावर झाला आहे. युद्धजन्य परिस्थितीचा फटका निर्यातक्षम द्राक्षांच्या निर्यातीलाही बसला आहे. मात्र देशांतर्गत बाजारपेठेत मागणी चांगली असल्याचे मोरे यांनी सांगितले.....असे आहेत द्राक्षांचे दर (प्रति १५ किलो)सुपर सोनाका ९०० ते १५०० रु.सोनाका ८०० ते १२०० रु.माणिक चमन ७०० ते ११०० रु.तास-ए-गणेश ७०० ते ११०० रु..मी या वर्षी दीड एकरांत कलिंगड घेतले होते. प्लॉट नुकताच संपला असून, ३० टन उत्पादन, तर प्रति किलोला १५ ते १८ रुपये दर मिळाला.आता उन्हाळ्याच्या हिशेबाने दुसऱ्या वाणाची लागवड केली आहे. त्याचे उत्पादन एप्रिलमध्ये सुरू होईल.सलमान शेख ९२८४४७७५६६, निमगाव केतकी, ता. इंदापूर, जि.पुणे.‘मी दरवर्षी रमजान महिन्याची मागणी ओळखून दोन एकरांत खरबुजाची लागवड करतो. याही वर्षी लागवड केली असून, १५ दिवसांपासून काढणी सुरू झाली आहे. सध्या दोन दिवसांत १०० ते १५० क्रेट या प्रमाणात उत्पादन मिळत आहे. पुणे बाजार समितीमध्ये हा माल विक्रीसाठी आणत आहे. पहिल्या तोड्याला २४ ते २५ रुपयांपर्यंत दर मिळाला होता. सध्या बाजारातील आवक वाढल्याने दर २० रुपयांपर्यंत खाली आले आहेत.संदीप भुजबळ ९७६६९०६८६३, काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर.पांडुरंग सुपेकर ९८५०२७४७४७, (अडतदार, पुणे बाजार समिती)नितीन कुंजीर ९८२३१३५४२५(अडतदार अरविंद मोरे ९०१११०८९१८(द्राक्ष अडतदार) .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.