Areca Nut : आयातीचा सुपारीच्या दराला फटका

Team Agrowon

सुपारीचा मान

प्रत्येक मंगलकार्यामध्ये पुजेसाठी सुपारीचा वेगळा मान असतो. त्यामुळे भारतात सुपारीला मोठी मागणी असते.

Areca Nut | Agrowon

सुपारीचे पीक

यंदा अवकाळी पाऊस, रोगांचा प्रादुर्भाव असूनही गुहाघर तालुक्यात सुपारीचे भरघोस पीक आले आहे.

Areca Nut | Agrowon

सुपारी आयात

मात्र, बाहेरून होणाऱ्या आयातीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुपारीच्या दरात घट झाली आहे.

Areca Nut | Agrowon

सुपारी दर

सुपारीचे दर घटल्याने याचा मोठा आर्थिक फटका सुपारी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

Areca Nut | Agrowon

फळबाग लागवड योजना

त्यामुळे सुपारीचा समावेश राज्याच्या फळबाग लागवड योजनेत करण्याची मागणी बागायतदार करत आहेत.

Areca Nut | Agrowon

सुपारी मार्केट

गुहाघर तालुक्यातली सुपारी मुंबईच्या वाशी मार्केटला जाते. तेथून ही सुपारी मोठ्या प्रमाणात गुजरातला पाठवली जाते.

Areca Nut | Agrowon

सुपारीची विक्री

मात्र, थायलंडसह कर्नाटक राज्यातून स्थानिक बाजारात कमी दराने सुपारीची विक्री केली जात आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना दर मिळत नाही.

Areca Nut | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....