Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Sowing : नांदेड जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय घट

Kharif Season : नांदेड जिल्ह्यात खरिपातील पेरण्या आटोपल्या आहेत. आजपर्यंत सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ९७.५७ टक्क्यांनुसार सात लाख ४८ हजार १५७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : नांदेड जिल्ह्यात खरिपातील पेरण्या आटोपल्या आहेत. आजपर्यंत सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ९७.५७ टक्क्यांनुसार सात लाख ४८ हजार १५७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक चार लाख ४१ हजार ९४५ हेक्टरवर सोयाबीन, तर दोन लाख पाच हजार ७७९ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. यंदाही ज्वारी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ १७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

जिल्ह्यात खरीप हंगामात सात लाख ६६ हजार ८०९ हेक्टर सर्वसाधारण पेरणी क्षेत्र आहे. यंदा मृग नक्षत्रात पेरण्यांच्या कामांना सुरुवात झाली. यानंतर पावसाने ओढ दिल्याने पेरण्यांचे कामे खोळंबली होती. परंतु जूनच्या दुसऱ्या पंधरवाड्यात झालेल्या पावसामुळे खरिपातील पेरण्यांना प्रांरभ झाला.

परंतु हा पाऊस सर्वदूर नसल्याने ठरावीक भागातच पाऊस झाला होता. यानंतर मात्र पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावल्याने सर्वत्र पेरण्यांना सुरुवात झाली. पाऊस लांबल्याने यंदा मात्र ज्वारी, उडीद तसेच मुगाचा पेरा घटला आहे. जिल्ह्यात सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ९७ टक्क्यांनुसार सात लाख ४८ हजार १५७ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.

यात सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या १२५ टक्क्यांनुसार चार लाख ४१ हजार ९४५ हेक्टरवर सोयाबीन तर सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ८५ टक्क्यांनुसार दोन लाख पाच हजार ७७९ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ९० टक्क्यांनुसार ६१ हजार हेक्टरवर तुरीची पेरणी झाल्याची माहिती मिळाली.

जिल्ह्यात बुधवारपर्यंत झालेली पेरणी (क्षेत्र हेक्टरमध्ये)

पीक पेरणी क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र टक्केवारी

ज्वारी ४४,७४० ५,५९६ १६.९८

मका ८२३ १,५५६ १८९.०६

तूर ६७,४२३ ६१,००७ ९०.४८

मूग २७,३९२ १४,७०४ ४७.२७

उडीद २९,६२४ १४,००३ २९.८४

सोयाबीन ३,५३,३१४ ४,४१,९४५ १२५.०९

कपाशी २,४१,२८२ २,०५,७७९ ८५.२९

एकूण ७,६६,८०९ ७,४८,१५१ ९७.५७

ज्वारी, तूर, मुगाच्या पेरणीत घट

नांदेड जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात सातत्याने घट होत आहे. यंदाही ज्वारी सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या १६.९८ टक्क्यांनुसार सात हजार ५६९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यासोबतच सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ४७ टक्क्यांनुसार १४ हजार ७०३ हेक्टरवर मुग, सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ३० टक्क्यांनुसार १४ हजार तीन हेक्टरवर उडीद पेरणी झाली आहे. शासन कडधान्य व तृणधान्य पेरणीचे क्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न करीत असलेतरी यात मात्र दरवर्षी घट होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT