Cotton Cultivation : कपाशीची दोन लाख हेक्टरवर लागवड

Cotton Production : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत या वर्षीच्या खरीप हंगामात शुक्रवार (ता. १२)पर्यंत कपाशीची २ लाख २६ हजार ६४ हेक्टरवर लागवड झाली आहे.
Cotton Farming
Cotton FarmingAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत या वर्षीच्या खरीप हंगामात शुक्रवार (ता. १२)पर्यंत कपाशीची २ लाख २६ हजार ६४ हेक्टरवर लागवड झाली आहे. त्यात परभणी जिल्ह्यात १ लाख ९१ हजार २१३ पैकी १ लाख ९१ हजार ५७३ हेक्टर (९९.६७ टक्के), तर हिंगोली जिल्ह्यात ३८ हजार ८२१ पैकी ३४ हजार ४९१ हेक्टर (८८.८५ टक्के) लागवड झाली आहे. या दोन जिल्ह्यांतील आठ तालुक्यांमध्ये यंदा कपाशीची सरासरीपेक्षा जास्त लागवड झाली आहे.

कृषी विभागाकडील आकडेवारीनुसार शुक्रवार (ता. १२)पर्यंत या दोन जिल्ह्यांत एकूण खरिपाची ७ लाख ९७ हजार ११९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. परभणी जिल्ह्यात ५ लाख ३४ हजार ८९९ पैकी ४ लाख ७६ हजार २८९ हेक्टरवर (८९.०४) टक्के पेरणी झाली. त्यात कपाशीची १ लाख ९१ हजार ५७३ हेक्टर लागवड झाली आहे.

Cotton Farming
Cotton Production : कापूस उत्पादन वाढीसाठी गळफांदी कापणे फायदेशीर

सोयाबीनची २ लाख ४९ हजार ७२७ पैकी २ लाख ४५ हजार ७४४ हेक्टरवर (९८.४० टक्के) पेरणी झाली. तुरीची ४५ हजार ९५९ पैकी ३० हजार ७७८ हेक्टर (६६.९७ टक्के), मुगाची २७ हजार १७८ पैकी ४ हजार ८६४ हेक्टर (१७.९०टक्के), उडदाची ९ हजार ८० पैकी १ हजार ३६३ हेक्टरवर (१५.०२ टक्के) पेरणी झाली. ज्वारीची ७ हजार ३३३ पैकी ९६८ हेक्टर (१३.२१ टक्के), बाजरीची १ हजार १६७ पैकी १९० हेक्टर (१६.२७ टक्के), मक्याची १ हजार ३ पैकी ६०५ हेक्टर (६०.२५ टक्के) पेरणी झाली आहे.

Cotton Farming
Cotton Cultivation : कापसाची लागवड २७ लाख हेक्टरवर

हिंगोली जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार ५४ पैकी ३ लाख २० हजार ८३० हेक्टरवर (८८.८६ टक्के) पेरणी झाली. त्यात कपाशीची ३४ हजार ४९१ हेक्टर लागवड झाली. सोयाबीनची २ लाख ५६ हजार ४०४ पैकी २ लाख ४१ हजार ४०८ हेक्टर (९४.१२ टक्के) पेरणी झाली. तुरीची ४५ हजार ३०६ पैकी ३३ हजार ५६९ हेक्टर (७४.०९ टक्के), मुगाची ७ हजार ७८१ पैकी ४ हजार ७६८ हेक्टर (६१.२७ टक्के), उडदाची ५ हजार ८७९ पैकी ३ हजार ४८९ हेक्टर (५९.३५ टक्के) पेरणी झाली. ज्वारीची ५ हजार ५०५ पैकी २ हजार ५१२ हेक्टर (४५.६३ टक्के), मक्याची १ हजार २१८ पैकी ४५२ हेक्टर (३७.०९ टक्के) पेरणी झाली आहे.

परभणी -हिंगोली जिल्हे कपाशी लागवड स्थिती (हेक्टरमध्ये) शुक्रवार (ता. १२ पर्यंत)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

परभणी ३२००० २७३७६ ८५.५५

जिंतूर २७२८५ २७१११ ९९.३६

सेलू २९८३१ ३१७७३ १०६.५१

मानवत २१२३३ २१४४४ १००.९९

पाथरी २१२२८ १८७०४ ८८.११

सोनपेठ १६४०१ १६८१५ १०२.५२

गंगाखेड १९६८३ २४२४३ १२३.१६

पालम १४५३५ १६६८० ११४.७४

पूर्णा १००१५ ७४२७ ७४.१६

हिंगोली २९७९ ६५६१ २२०.१९

कळमनुरी ८२७९ ८२१९ ९९.२८

वसमत १७००० ८०६९ ४७.४६

औंढानागनाथ ६७०२ ७४०० ११०.४१

सेनगाव ३८६० ४२४२ १०९.९०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com