Cotton Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : अकोला, बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन आणि कपाशीचे मोठे नुकसान!

Rain Update : सोयाबीन सोंगणीचा हंगाम शिगेवर असून याच काळात आता पाऊस पुन्हा धुमाकूळ घालू लागला आहे. बुधवारी (ता.९) सायंकाळी अनेक भागांत जोराचा पाऊस झाला.

Team Agrowon

Akola News : सोयाबीन सोंगणीचा हंगाम शिगेवर असून याच काळात आता पाऊस पुन्हा धुमाकूळ घालू लागला आहे. बुधवारी (ता.९) सायंकाळी अनेक भागांत जोराचा पाऊस झाला. या पावसाने सोंगणी केलेल्या सोयाबीनच्या सुड्या भिजल्या आहेत. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी कपाशीच्या शेतात झाडावरील फांद्या तुटून पडल्या. वीज पडून मालेगाव तालुक्यात एका शेतमजुराचा मृत्यू झाला.

अकोला जिल्ह्यात बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर व परिसरात जोरदार पाऊस झाला. कारंजा-पिंजर मार्गावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत होते. सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत पावसाने धुमाकूळ घातला. जिल्ह्यात अकोट तालुक्यातही विविध ठिकाणी जोरदार वादळी पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यात खामगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, मेहकर आदी तालुक्यांमध्ये पाऊस झाला. वाशीम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात पावसाने हजेरी दिली.

या पावसाने काढणी सुरू असलेल्या सोयाबीनचे नुकसान होऊ शकते. सोंगणी केलेल्या सुड्या भिजत असून त्यातून कोंब येऊ शकतात. मालाचा दर्जाही खालावू शकतो. दुसरीकडे हाच पाऊस तुरीच्या पिकासाठी फायदेशीर ठरणार आहे.

वीज पडून शेतमजूर मृत्यू

मालेगाव (जि. वाशीम) तालुक्यातील सुदी शेतशिवारात प्रकाश मनोहर कांबळे (वय ३२) या शेतमजूर युवकाच्या अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला. तर शुभम रंजित मोहळे (वय २८) हा युवक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली. यवतमाळ जिल्ह्यातील पांढुर्णा येथील काही महिला व पुरुष आपल्या कुटुंबासमवेत सोयाबीन कापणीच्या कामासाठी राजुरा शेतशिवारात आलेले आहेत. प्रकाश कांबळे हा सुद्धा त्याची पत्नी ज्योत्स्ना (वय ३० वर्षे ), मुलगी नंदिनी (वय ८ वर्षे) व भाऊ पंकज (वय २१) यांच्यासमवेत सोयाबीन पीक कापणीच्या कामासाठी आलेला होता. प्रकाश कांबळे हा राजुरा येथील सुनीता रंजित मोहळे यांच्या शेतात सोयाबीन कापणीचे काम करीत होता. दरम्यान, प्रकाशच्या अंगावर वीज पडली. त्याच्या बाजूलाच असलेल्या शेत मालकाचा मुलगा शुभम रंजित मोहळे (वय २८) याला धक्का बसला. रुग्णालयात नेत असतानाच प्रकाश कांबळे याचा मृत्यू झाला.

बुलडाणा जिल्ह्यातील वळती (ता. चिखली) येथे जोराच्या वाऱ्यासह पाऊस पडला. सोंगणी केलेले काहींचे सोयाबीन भिजले. जोराच्या हवेमुळे झाकून ठेवलेल्या सोयाबीन सुडीवरील कापड उडाले. काहींच्या शेतात सोयाबीनची मळणी सुरू असतानाच पाऊस सुरू झाल्याने माल झाकण्यासाठी तारांबळ उडाली. पावसामुळे अजूनही वाफसा तयार झालेला नाही. त्यामुळे गुरुवारी सोयाबीन सोंगणीचे काम बंद ठेवावे लागले. दोन दिवस पावसाचा अंदाज असल्याने धास्ती भरली आहे. हा पाऊस आता फायद्यापेक्षा नुकसानकारक अधिक ठरतो आहे.
मोहन जगताप, शेतकरी, वळती, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT