Crop Damage Compensation : अतिवृष्टीबाधितांसाठी ४१९ कोटी रुपयांवर निधी आवश्यक

Heavy Rain Crop Loss : हिंगोली जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे २ लाख ९५ हजार १७१.२५ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाल्याचे पंचनाम्यानंतर स्पष्ट झाले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Hingoli News : यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे हिंगोली जिल्ह्यातील ५ तालुक्यातील जिरायती, बागायती, फळपिके मिळून २ लाख ९५ हजार १७१.२५ हेक्टरवरील शेतीपिकांचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाले असून २ लाख ९६ हजार ७७९ शेतकरी बाधित झाले आहेत.

शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ४१९ कोटी ४८ लाख २१ हजार ३०६ रुपये निधी आवश्यक आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली. हिंगोली जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे २ लाख ९५ हजार १७१.२५ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाल्याचे पंचनाम्यानंतर स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात ० ते २ हेक्टर मर्यादेत २ लाख ५९ हजार ४८० शेतकऱ्यांचे २ लाख ४४ हजार ७९६.३७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Crop Damage
Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

त्यात सर्व ५ तालुक्यातील जिरायती पिकांचे २ लाख ३२ हजार ४९८.०२ हेक्टर, बागायती पिकांचे ११ हजार ४६३.८५ हेक्टर, हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव या तालुक्यातील फळपिकांचे ८३४.५० हेक्टर बाधित क्षेत्र आहे. नुकसानीपोटी जिरायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपयानुसार ३१६ कोटी १९ कोटी ७३ हजार ७२ रुपये, बागायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी २७ हजार रुपयेनुसार ३० कोटी ९५ लाख २३ हजार ९५० रुपये, फळपिकांसाठी प्रतिहेक्टरी ३६ हजार रुपयेनुसार ३ कोटी ४२ हजार रुपये मिळून एकूण ३५० कोटी १५ लाख ३९ हजार २२ रुपये निधी आवश्यक आहे.

Crop Damage
Crop Damage Compensation : पीक नुकसानीचे अनुदान आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर

जिल्ह्यातील २ ते ३ हेक्टर मर्यादेत ३७ हजार २९९ शेतकऱ्यांच्या ५० हजार ३७४.८८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सर्व ५ तालुक्यातील जिरायती पिकांचे ४९ हजार ७६४.१४ हेक्टर, हिंगोली, कळमनुरी तालुक्यातील बागायती पिकांचे ६१०.७४ हेक्टर क्षेत्र बाधित आहे. बाधितांच्या मदतीसाठी अपेक्षित ४९१ कोटी ४८ लाख २१ हजार ३०६ रुपये मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली असल्याचे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

हिंगोली जिल्हा तालुकानिहाय अतिवृष्टी

मदत निधी मागणी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका बाधित शेतकरी बाधित क्षेत्र अपेक्षित निधी

हिंगोली ५२६५० ५८७६६ ८१ कोटी ४४ लाख रुपये

कळमनुरी ५९०१३ ६०६१९ ८५ कोटी ९२ लाख रुपये

वसमत ७५२६२ ६२१८९ ८९ कोटी ६५ लाख रुपये

औंढानागनाथ ४९९२८ ४८६६० ६९कोटी १४ लाख रुपये

सेनगाव ५९९२९ ६४९३५ ९३ कोटी ३१ लाख रुपये

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com