Women's self-help group Agrowon
ॲग्रो विशेष

Women's Self-Help Group : रत्नागिरीच्या शुभांगी राजवीर यांनी बचत गटांच्या माध्यमातून केली शेतीची प्रगती

Mahila Bachat Gat : पारंपरिक भातशेतीतून उत्पादन वाढावे यासाठी वेहेळ (ता.चिपळूण,जि.रत्नागिरी) येथील श्रीमती शुभांगी राजवीर यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार लागवडीत बदल केले. वैयक्तिक शेतीबरोबरच गावातील महिला बचत गटाच्या माध्यमातून भाजीपाला, कलिंगड लागवडीतून त्यांनी स्वतःचे उत्पन्न वाढविण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत.

राजेश कळंबटे

वेहेळे-राजवीर वाडी येथील शुभांगी राजवीर यांचा १९९२ ला विवाह झाला. सुरवातीला त्या काही वर्षे पतीबरोबर मुंबईत वास्तव्याला होत्या. १९९९ ला त्या गावाकडे परतल्या. गावी आल्यानंतर त्या पारंपरिक पद्धतीने भातशेती करत होत्या.

या दरम्यान गावामध्ये कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसह महिला बचत गटांसाठी भात लागवडीचे प्रशिक्षण घेण्यात आले होते. त्यामध्ये उत्पादन वाढविण्यासाठीच्या उपाययोजना सुचवण्यात आल्या. त्याची वेहेळ गावात प्रात्यक्षिकेही झाली.

शुभांगी यांनी आपल्या कुटुंबीयांना विश्‍वासात घेऊन नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग भात शेतीमध्ये करण्याचा निर्णय केला. यातून भात उत्पादनात चांगली वाढ झाली.

बचत गटातून शेतीची प्रगती

वेहेळमध्ये २०१४ च्या दरम्यान महिलांनी एकत्र येऊन प्रगती आणि भाग्यश्री शेतकरी स्वयंसहायता गट स्थापन झाली. त्यामध्ये शुभांगी राजवीर यांचा मोठा वाटा होता. पंचायत समितीमार्फत महिला बचत गटांची चळवळ सुरु झाली होती.

या दरम्यान दिशांतर संस्थेचे राजेश जोष्टे यांच्याकडून बचत गटाला शेती विकासाबाबत मार्गदर्शन मिळाले. बचत गटातील महिलांना सेंद्रिय शेती, जीवामृत व दशपर्णी अर्क निर्मिती आणि वापराबाबत प्रशिक्षण आणि शेतीमाल विक्रीबाबत मार्गदर्शन मिळाले.

शुभांगी राजवीर यांच्या पुढाकाराने गटातील दहा महिलांनी एकत्रित येऊन २०१४ ला पहिल्याच हंगामात सात एकर क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिके घेतली. या महिलांनी बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन पडवळ, दोडका, काकडी, कारले, लालमाठ, मुळा, भेंडी, मिरची, घेवडा यासह एक एकरावर कलिंगडाची लागवड केली.

तीन महिन्यामध्ये उत्पादनही सुरु झाले. गटाला शेती विकासासाठी खते, बियाणे, यंत्रसामग्री अशी सुमारे पाच लाखांची मदत मिळाली होती.पहिल्याच वर्षी पावणेसहा लाख रुपयांचे उत्पन्न गटाला मिळाले. त्यामुळे गटातील प्रत्येक महिलेला उत्पन्न मिळू लागले.

शुभांगी राजवीर म्हणाल्या की, दिशांतर संस्थेच्या मदतीने दुबार शेतीची संकल्पना आम्ही सत्यात आणली. पूर्वी आम्ही फक्त भातशेती करत होतो. आता तीनही हंगामात शेतीचे नियोजन करत आहोत. पूर्वी आम्हाला मजुरी हाच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन होते.

गटाने सुरु केलेल्या शेती व्यवसायातून वार्षिक उत्पन्नही वाढले. शेडनेट लावून पावसाळ्यात भाजीपाला लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. यामध्ये लालमाठ, कारली, काकडी, मुळा लागवड करतो.

शेतामध्येच एका बाजूला शेडनेट लावून तयार केलेल्या खोलीत अळंबीचेही उत्पादन आम्ही घेत आहोत. बारमाही भाजीपाला लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. २०२२ मध्ये गटाची साडेसात लाख रुपये उलाढाल झाली असून त्यातील साडेचार लाख रुपये गटातील दहा महिलांनी मजुरी म्हणून वाटून घेतले.

शेतीमाल विक्रीसाठी प्रयत्न

* गावातील ग्राहकांना भाजीपाला, कलिंगडाची थेट विक्री.

* चिपळूण शहरातील मान्यवरांना गावात शिवारफेरीसाठी आमंत्रण.

* सेंद्रिय पद्धतीने उत्पादित कलिंगड, ताजी भाजी ग्राहकांच्या पसंतीस.

* भाजी, कलिंगड विक्रीसाठी चिपळूण शहरात विक्रीसाठी स्टॉल.

संपर्क : शुभांगी राजवीर, ९३२५५३७०३२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crops: जीएम आणि जनुकीय संपादित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?; तज्ज्ञ म्हणतात...

Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाविरोधात छगन भुजबळ न्यायालयात जाणार; कागदपत्रांची बारकाईने पडताळणी सुरू

Shikshanratna Award: डॉ. साताप्पा खरबडे यांचा शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मान

Poultry Industry : फ्रोझन चिकनवरील जीएसटी हटवण्याची मागणी

UP Kharif Sowing: उत्तर प्रदेशात यावर्षीच्या खरीप हंगामात बंपर पीक उत्पादन अपेक्षित

SCROLL FOR NEXT