Cashew Processing : देवगड, वेंगुर्ल्यात काजू प्रकिया उद्योगात ६० हून अधिक बचत गट

पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रकिया उद्योग योजनेअंतर्गत जिल्ह्यात शिरगाव आणि आरोंदा ही दोन सामाईक केंद्रे मंजूर झाली असून त्या केंद्रांतर्गत ६० हून अधिक महिला बचत गट काजू प्रकिया आणि काजू खरेदी विक्री उद्योगात उतरत आहेत.
Cashew Processing
Cashew Processing Agrowon

Sindhudurg News ः पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रकिया उद्योग योजनेअंतर्गत (Food Processing Scheme) जिल्ह्यात शिरगाव आणि आरोंदा ही दोन सामाईक केंद्रे मंजूर झाली असून त्या केंद्रांतर्गत ६० हून अधिक महिला बचत गट काजू प्रकिया (Cashew Processing) आणि काजू खरेदी विक्री उद्योगात उतरत आहेत.

प्रतिदिन १० टन काजूवर प्रकिया करण्यात येणार असून २५० कुटुंबांना यातून रोजगार उपलब्ध होणार आहे. प्रत्यक्षात ८ प्रकिया युनिटचे काम सुरू झाले आहे. तर उर्वरित युनिटचे काम या महिना अखेर सुरू होणार आहे.

महिला बचत गटातील महिला रोजगार निर्माण व्हावा या हेतुने पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रकिया उद्योग योजनेंतर्गत जिल्हा संसाधन व्यक्ती डॉ. आनंद तेंडुलकर यांनी काजू बी खरेदी, काजू प्रकिया आणि उत्पादित मालाला बाजारपेठ या अनुषंगाने शिरगाव (ता. देवगड)आणि आरोंदा (ता. वेंगुर्ला) या दोन प्रभागांचे परिपूर्ण प्रस्ताव तयार करून मंजुरीकरीता पाठविले होते.

Cashew Processing
Cashew Orchard : आरोसमध्ये आगीत आंबा, काजूची झाडे जळाली

या दोन्ही प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून आता या दोन प्रभागातील ४० बचत गट प्रकिया उद्योगात तर २० महिला बचत गट काजू बी खरेदी विक्री व्यवसायात उतरत आहेत. या प्रकल्पांतर्गत प्रतिदिन १० टन काजू बी वर प्रकिया होणार आहे. या प्रकल्पातून २५० महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

Cashew Processing
Cashew Rate : काजू बीला किती मिळतोय दर?

या प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात येत असलेल्या शिरगावातील ८ युनिटचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, डॉ. आनंद तेंडुलकर, उमेदचे जिल्हा समन्वयक वैभव पवार, जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय दिवेकर, संभाजी घाडी, उमेद समूह संघटक अभिजित चव्हाण यांच्या उपस्थितीत झाले आहे.

शिरगाव आणि आरोंदा या दोन प्रभागात काजू बी वर प्रकियेचे ४० युनिट सुरू होणार आहेत. याशिवाय २० बचत गट काजू बी खरेदी विक्री व्यवसायात असणार आहेत. या प्रकल्पामुळे बचत गटांतील महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. सर्व प्रकल्प सुरू झाल्यानंतर सरासरी प्रतिदिन १० टन काजू बी वर प्रकिया होईल, अशी अपेक्षा आहे. अशा पद्धतीचा राज्यातील हा पहिला प्रयोग आहे.

- डॉ. आनंद तेंडुलकर, जिल्हा संसाधन व्यक्ती, सिंधुदुर्ग

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com