land improvement Agrowon
ॲग्रो विशेष

Land Improvement : ‘श्री दत्त’च्या क्षारपड जमीन सुधारणा तंत्रज्ञानास ‘पेटंट’

Shree Datt Sugar Factory : शिरोळ, जि. कोल्हापूर येथील श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याने क्षारपड जमीन सुधारण्यासाठी मुख्य बंदिस्त पाइपलाइन व सच्छिद्र निचरा प्रणालीच्या माध्यमातून ‘दत्त पॅटर्न’ निर्माण केला आहे. या प्रणालीस केंद्र शासनाचे बौधिक संपदा हक्क (पेटंट) मिळाले आहेत.

Team Agrowon

Kolhapur News : शिरोळ, जि. कोल्हापूर येथील श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याने क्षारपड जमीन सुधारण्यासाठी मुख्य बंदिस्त पाइपलाइन व सच्छिद्र निचरा प्रणालीच्या माध्यमातून ‘दत्त पॅटर्न’ निर्माण केला आहे. या प्रणालीस केंद्र शासनाचे बौधिक संपदा हक्क (पेटंट) मिळाले आहेत. यामुळे नजीकच्या काळात संपूर्ण देशभरात क्षारपड जमीन सुधारण्यासाठी ‘दत्त पॅटर्न’ नावारूपास येण्याची शक्यता आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिली.

या प्रसंगी दत्त कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, शेती अधिकारी शैलेश हेगांणा, उद्योगपती अशोक कोळेकर, मयूर पटेल, जनसंपर्क अधिकारी विश्वास काळे, संचालक इंद्रजित पाटील आदी उपस्थित होते.

‘शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमीन सुधारण्यासाठी कारखान्याकडून गेली सहा वर्षे प्रयत्न सुरू आहेत. क्षारपड जमीनधारक शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांना संघटित करून त्यांची सहकारी संस्था स्थापन केली. त्याद्वारे शेतकऱ्यांना डॉ. अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक व वीरशैव सहकारी बँकेकडून कर्जपुरवठा केला.

शेतकऱ्यांनी नापिक शेतामध्ये सच्छिद्र पाइपप्रणाली व मुख्य बंदिस्त पाइपलाइनचा उपयोग करून शेतातील अतिरिक्त पाणी व या पाण्यातील क्षार बाहेर काढण्यासाठी संघटित प्रयत्न केले. जमीन सुधारण्यासाठीचा हा प्रयोग तालुक्यातील ८ हजार एकर जमिनींमध्ये राबविण्यात आला आहे. यामध्ये १९२ किलोमीटर बंदिस्त मुख्य पाइपलाइन पूर्ण झाली आहे.

जमिनी पिकाऊ बनू लागल्या’

‘‘ज्या शेतकऱ्यांनी शेतात सच्छिद्र पाइपप्रणालीचा प्रयोग अमलात आणला, त्यांच्या जमिनी पिकाऊ बनू लागल्या आहेत. शेतकरी वेगवेगळी पिके घेऊ लागले आहेत. यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यास मदत होत आहे. जमिनी क्षारमुक्त होण्यासाठी या तंत्राचा वापर यशस्वी झाला,’’ असे गणपतराव पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, ‘‘केंद्रीय क्षार जमीन संशोधन केंद्र, कर्नाल (हरियाना) या संस्थेने मान्यता दिली आहे. यामुळे केंद्र शासनाचे ‘पेटंट’ मिळाले आहे. ही बाब क्षारपडग्रस्त शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारी आहे. भविष्यात जमीन सुधारण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने भरीव मदत केल्यास शेती पुन्हा पिकाऊ होऊन देशाच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT