Land Survey : क्षारपड जमीन सुधारणासाठी शिरोळ, नृसिंहवाडीत सर्व्हे

आतापर्यंत साडेसात हजार एकरावर क्षारपड मुक्तीचे काम झाले असून शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे.
Land Survey
Land SurveyAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : क्षारपड मुक्तीचे काम म्हणजे मानवी श्रमाचे अद्भुत उदाहरण आहे, असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे यांनी काढले.

कै. श्री. पी. के. माने सर क्षारपड जमीन सुधारणा व कृषी पूरक उद्योग सहकारी संस्था मर्यादित शिरोळ, श्री म्हाळसाकांत सहकारी सच्छिद्र पाईपलाईन संस्था शिरोळ नृसिंहवाडी यांच्या वतीने शिरोळ, नृसिंहवाडी हद्दीतील २५० एकर क्षेत्रावर सर्वेक्षणाच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी शिरगुप्पे बोलत होते.

श्री दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील म्हणाले, की आपली जमीन क्षारपडमुक्त व्हावी यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. ही बाब खरोखरीच कौतुकास्पद आहे. श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांना या प्रकल्पासाठी सर्व ती मदत केली जात आहे.

Land Survey
Land Acquisition : ‘एमआयडीसी’ला जागा देण्यास नवापुरातील शेतकऱ्यांचा विरोध

आतापर्यंत साडेसात हजार एकरावर क्षारपड मुक्तीचे काम झाले असून शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगान्ना व इंजिनिअर किर्तीवर्धन मरजे यांनी या योजनेची संपूर्ण माहिती सांगितली. ‘दत्त’चे संचालक दरगु गावडे, हसन देसाई, पवन शेट्टी-नृसिंहवाडी यांनी मनोगत व्यक्त केले.

स्वागत पांडुरंग माने यांनी केले. आभार प्रकाश माने यांनी मानले. या वेळी इंजिनिअर सुदर्शन तकडे, नगरसेवक श्रीवर्धन देशमुख, रघुनाथ आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com