Sugar Factory Cogeneration Award Agrowon
ॲग्रो विशेष

National Cogeneration Award : श्री दत्त शेतकरी सहकारी कारखान्याला राष्ट्रीय पुरस्कार

Sugar Factory Award : तांत्रिक कार्यक्षमतेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल कारखान्याला मानाचा प्रथम क्रमांकाचा देश पातळीवर पुरस्कार मिळाला.

Team Agrowon

Kolhapur News : ‘को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया’च्या वतीने तांत्रिक कार्यक्षमता या विभागामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याला देश पातळी वरील प्रथम क्रमांकाचे ‘नॅशनल को जनरेशन अॅवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कारखान्याचे को जन मॅनेजर विजयकुमार इंगळे यांना ‘बेस्ट को जन मॅनेजर’ म्हणून गौरविण्यात आले.नॅशनल को जनरेशन पुरस्कार २०२४ सोहळा पुणे येथे झाला.

माजी कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला. को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने देशातील सहकारी व खासगी क्षेत्रातील साखर कारखान्यांमध्ये असलेल्या को जनरेशन प्लँट बद्दल माहिती घेऊन विविध विभागामध्ये सर्वोत्कृष्ट असणाऱ्या कारखान्यांना पुरस्कार देऊन गौरव केला जातो.

देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, उत्तर प्रदेश यास विविध राज्यातील खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. खासगी व सहकारी क्षेत्रातील कारखान्याच्या को जनरेशन प्लँट साठी श्री दत्त साखर कारखान्याने सहभाग नोंदविला होता.

तांत्रिक कार्यक्षमतेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल कारखान्याला मानाचा प्रथम क्रमांकाचा देश पातळीवर पुरस्कार मिळाला.

कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, उद्यानपंडित गणपतराव पाटील, अध्यक्ष रघुनाथ पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, को जन मॅनेजर विजयकुमार इंगळे यांना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT