Banana Export  Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Export : देशात निर्यातक्षम केळीचा तुटवडा; दर टिकून

Banana Rate : देशात निर्यातीच्या केळीचा तुटवडा जाणवत आहे. सध्या सुमारे १०५ ते ११० कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात आखातासह इतर देशांत सुरू आहे.

Chandrakant Jadhav

Jalgaon News : देशात निर्यातीच्या केळीचा तुटवडा जाणवत आहे. सध्या सुमारे १०५ ते ११० कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात आखातासह इतर देशांत सुरू आहे.

खानदेशात रावेर, यावल भागांतील आवक पूर्ण होत आली आहे. या भागातून पिलबाग केळीमधून पुढे आवक सुरू होईल. सध्या खानदेशात एकूण ११० ते ११२ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक सुरू आहे. यात श्रीनगर (काश्मीर) व परदेशात पाठवणुकीच्या केळीचे दर २००० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. तसेच १५०० ते १६०० रुपये दर पंजाब, हरियाना भागांत पाठविल्या जाणाऱ्या केळीला आहेत. तर कमी दर्जाच्या केळीचे दर ७००, ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल, असे खानदेशात आहेत.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा व अक्कलकुवा भागांतही केळीची आवक कमी आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जामनेर, यावल, पाचोरा, धुळ्यातील शिरपूर भागात आगाप कांदेबाग केळीची आवक अलीकडेच सुरू झाली आहे. ही आवक पुढे वाढेल.

देशातून १०० कंटेनरची निर्यात सुरू आहे. देशात सध्या गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेशातून आखातात केळी पाठविली जात आहे. गुजरातमधील कामरेज भागातून निर्यातीच्या केळीची काढणी पूर्ण होत आली आहे. तेथील राजपिपला व लगतच्या भागातून आखातात केळीची पाठवणूक सुरू आहे. निर्यातीच्या केळीचा तुटवडा असल्याने दर टिकून आहेत. सप्टेंबरअखेरीस बिहार, उत्तर प्रदेशात केळीची आवक सुरू होईल. परंतु या केळीला स्थानिक बाजारातच उठाव राहील. दाक्षिणात्य भागातही अपवाद वगळता निर्यातीची केळी उपलब्ध नाही.

निर्यातीत सोलापूरचा दबदबा

जळगाव जिल्ह्यातून केळीची आखातातील निर्यात बंद झाली आहे. पण जळगावनजीकच्या मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातून रोज चार कंटेनर केळी आखातात पाठविली जात आहे. बऱ्हाणपूर व बडवानी जिल्ह्यात मिळून रोज १०० ट्रक केळीची आवक होत आहे. तेथेही निर्यातीच्या केळीचे दर २००० रुपयांवर आहेत. बऱ्हाणपुरातील नाचणखेडा, दापोरी, बोदर्डी, फोपनार आदी भागांतून केळी निर्यात केली जात आहे. राज्यात सोलापुरातून मागील अनेक महिन्यांपासून केळीची निर्यात वेगात सुरू आहे. तेथून रोज ४० ते ४५ कंटेनर केळीची निर्यात परदेशात केली जात आहे.

देशात निर्यातीची केळी राज्यात सोलापुरात सध्या उपलब्ध आहे. तसेच गुजरात, मध्य प्रदेशातही निर्यातीची केळी आहे. पण तेथेही आवक कमी आहे. पुढेही परदेशात पाठवणुकीच्या केळीची आवक कमी राहील. यामुळे दर महिनाभरापासून २००० रुपयांवर टिकून आहेत.
- प्रेमानंद महाजन, केळी व्यापारातील जाणकार, तांदलवाडी (जि. जळगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत सात लाख २३ हजार अर्ज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

SCROLL FOR NEXT