Fertilizer  Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Shortage : जळगाव जिल्ह्यात १०.२६.२६ चा तुटवडा

Agriculture Department : रब्बी हंगामात पुरेशी खते उपलब्ध होतील, असा दावा कृषी विभागाने केला होता.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यात रब्बी हंगामातही पुरेशी खते शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. १०.२६.२६ खताचा तुटवडा सर्वत्र असून, त्यावर लिंकिंगही सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचा खतांवरील खर्च २० ते २५ टक्क्यांनी वाढला आहे.

रब्बी हंगामात पुरेशी खते उपलब्ध होतील, असा दावा कृषी विभागाने केला होता. यानंतर काही दिवस खते मुबलक होती. परंतु ऐन पीकवाढीच्या काळात म्हणजेच डिसेंबरमध्ये १०.२६.२६ खताची टंचाई तयार झाली आहे. जिल्ह्यात १०.२६.२६ ची मोठी मागणी इतर मिश्र खतांच्या तुलनेत अधिक असते.

कृषी विभागाने रब्बीसाठी खतपुरवठा लक्ष्यांक मंजूर करून घेतला. त्यात यंदा पोटॅशचा पुरवठा चार कंपन्यांनी करण्याची तयारी केली. त्यामुळे पोटॅशची समस्या कमी होती. परंतु १०.२६.२६चा तुटवडा तयार झाला. सुमारे एक लाख ४० हजार टन खतांचा पुरवठा रब्बीत होईल, असा लक्ष्यांक मंजूर आहे. परंतु सुरुवातीलाच पुरवठा बऱ्यापैकी होता. नंतर पुरवठा रखडला. काही कंपन्यांनी खतपुरवठा केलाच नाही.

एका कंपनीच्या १०.२६.२६ खताची मोठी मागणी असते. पण या कंपनीकडून १०.२६.२६चा पुरवठाच झाला नाही. सुमारे ७० हजार टन युरिया, २५ हजार टन पोटॅश, २३ हजार टन सुपर फॉस्फेट व अन्य खतांमध्ये मिश्र खतांचा पुरवठा लक्ष्यांक मंजूर आहे.

परंतु युरियासह पोटॅश व १०.२६.२६ चा पुरवठा निर्देशानुसार विविध महिन्यांत झालेला नाही. युरिया, पोटॅश पुरवठ्याची टक्केवारी ७० पर्यंतच आहे. तर मिश्र खतांमध्ये डीएपीचा पुरवठा बरा आहे. १०.२६.२६ व इतर खतांचा पुरवठा कमी आहे.

१०.२६.२६च्या तीन गोण्या हव्या असल्यास त्यावर एक हजार ते १२०० रुपये किमतीचे अन्नद्रव्ययुक्त खत घ्यावे लागते. एकाच वेळी आठ ते १० १०.२६.२६च्या गोण्या कुठल्याही खत विक्रेत्याकडे मिळत नाहीत. चार दुकानांवर फिरल्यानंतर चार - पाच गोण्या मिळतात.

त्यादेखील लिकींगवर घ्याव्या लागत असल्याने खतांवरील खर्च २० टक्के वाढला आहे. लहान शेतकऱ्यांना अनेक खत विक्रेते १०.२६.२६ देण्यास नकार देतात. यामुळे त्यांना वणवण फिरावे लागते. जिल्ह्यात जळगाव, चोपडा, यावल, जामनेर, रावेर, मुक्ताईनगर आदी सर्वच भागात १०.२६.२६ची समस्या आहे, अशी माहिती मिळाली.

केळी पट्ट्यात मागणी

जिल्ह्यात रब्बी हंगाम यंदा कमी आहे. यामुळे खतांची मागणी काहीशी कमी आहे. तरीदेखील १०.२६.२६ चा तुटवडा तयार झाला आहे. खतांची मागणी केळी पट्ट्यात म्हणजेच रावेर, मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर, पाचोरा-भडगाव, चाळीसगाव, जळगाव या भागांत अधिक आहे. मका, गहू व इतर पिकांची लागवड या भागात अधिक आहे. याच भागात १०.२६.२६ची समस्या अधिक असल्याची माहिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT