Jal Jeevan Mission Agrowon
ॲग्रो विशेष

Jal Jeevan Mission : ‘जल जीवन’च्या जागृतीसाठी लघुपटनिर्मिती स्पर्धा

Jal Jeevan Mission Awareness : ‘जल जीवन मिशन’बाबत जनजागृतीसाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने जिल्हास्तरीय लघुपट निर्मिती स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

Team Agrowon

Akola News : ‘जल जीवन मिशन’बाबत जनजागृतीसाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने जिल्हास्तरीय लघुपट निर्मिती स्पर्धा घेण्यात येणार आहेत. ३१ जानेवारीपूर्वी प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन मिशनच्या प्रकल्प संचालक अनिता तेलंग यांनी केले आहे.

‘जल जीवन मिशन’अंतर्गत ‘हर घर नल से जल’ देण्यासाठी पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. याबाबत प्रबोधनासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालय व राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे लघुपट स्पर्धा होत आहे. त्यात पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे ३१ हजार २१ हजार व ११ हजार रुपये, तसेच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धकांनी लघुपटाची निर्मिती, पटकथा, दृश्य, संकल्पना, संवाद, पार्श्वसंगीत, गीत, चित्रीकरण स्वतः केलेली असावी. पूर्वप्रकाशित किंवा व्यक्ती, संस्था, कंपनी, शासकीय विभागांनी त्यांच्या कामासाठी तयार केलेले लघुपट स्पर्धेसाठी सादर करू नयेत. कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन होत नसल्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्र स्पर्धकास सादर करणे बंधनकारक आहे.

लघुपट निर्मितीसाठी वापरलेले शूटिंग, साहित्य, व्यावसायिक दर्जाचे व उत्तम असावे. लघुपट निर्मितीची भाषा मराठी असावी. लघुपट स्पर्धेसाठी एक स्पर्धकाला एकाच विषयावरील लघुपट सादर करता येईल. लघुपट तीन ते पाच मिनिटांचा असावा.

पाण्याचे शाश्वत स्रोत, पाणी पुरवठा-देखभाल दुरुस्ती, जलसंवर्धन, ‘हर घर जल’ घोषित गाव विकास, ‘जल जीवन मिशन’ यशोगाथा, विविध योजनांचे कृतिसंगम असे स्पर्धेचे विषय आहेत. इच्छुकांनी लघुपट पेनड्राईव्हमध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, आगरकर विद्यालय परिसर, रेल्वे स्टेशन रोड, अकोला येथे येत्या ३१ जानेवारीपर्यंत सादर करावा, असे तेलंग यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT