Jaljeevan Mission : ‘जल जीवन मिशन’ लोकचळवळ व्हावी

आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी यांनी शाश्वत ग्रामविकासाकरिता मूलभूत सुविधा उज्ज्वला गॅस, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, जलशक्ती अभियान, अमृत सरोवर यांची प्रभावी अंमलबजावणी लोकसहभागातून करण्याचे ठरविले आहे.
Jaljeevan Mission
Jaljeevan Mission Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : शाश्वत ग्रामविकासासाठी जलजीवन मिशन योजना (Jaljeevan Mission) लोकचळवळ व्हावी, असे मत राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे (Cooperation Minister Atul Save) यांनी व्यक्त केले.

जल जीवन मिशनअंतर्गत ग्रामविकास संस्थेतर्फे छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित दोन दिवसीय ग्रामस्तरीय भागधारक क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्‍घाटक म्हणून सोमवारी (ता. २७) ते बोलत होते.

या प्रसंगी प्रवीण घुगे, राजेंद्र देसले, नरहरी शिवपुरे, एस. डब्ल्यू. नेहरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

सावे म्हणाले, की आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी यांनी शाश्वत ग्रामविकासाकरिता मूलभूत सुविधा उज्ज्वला गॅस, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, जलशक्ती अभियान, अमृत सरोवर यांची प्रभावी अंमलबजावणी लोकसहभागातून करण्याचे ठरविले आहे.

याचबरोबर राज्य सरकारनेही जलयुक्त शिवार अभियान (२), गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार आदी जलविषयक योजनांची जोड देऊन महाराष्ट्रात २०२४ पर्यंत ‘हर घर नल से जल’ देण्याचा निश्चय केलेला आहे.

Jaljeevan Mission
Jaljeevan Mission Scheme : जलजीवन मिशन योजना लोकचळवळ व्हावी

देसले म्हणाले, की जलजीवन मिशन योजनेची ग्रामस्तरीय भागधारकांनी लोकसहभागातून प्रभावी व परिणामकारक अमलबजावणी करून पिण्याच्या पाण्यापासून वंचित असलेल्या सर्व घटकांना पाणी मिळवून द्यावे.

वैशाली पाचेपाटील, उज्वला चव्हाण, रेखा वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. या पूर्वी पार पडलेल्या प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थीना प्रातिनिधिक स्वरूपात सरपंच व जलसुरक्षक यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

ग्रामविका संस्थेतर्फे बचत गटांमार्फत १२५ महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण व अर्थसाह्य देण्यात आलेल्या विविध व्यवसायात यशस्वी झालेल्या निवडक प्रतिनिधिक स्वरूपात सात महिलांचा सत्कार सावे यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रास्ताविक ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे यांनी केले. सूत्रसंचालन जयप्रकाश बागडे यांनी केले तर आभार बालाजी बिरादार यांनी मानले.

या प्रशिक्षण कार्यक्रमास छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आडगाव बुद्रुक, पांढरी पिंपळगाव परिसरातील बारा गावातील सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाकरिता राहुल रगडे, अर्चना पवार, निवृत्ती घोडके यांनी परिश्रम घेतले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com