Ulhas Patil Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Ulhas Patil Kolhapur : कोल्हापुरात ठाकरे गटाला धक्का; दोन माजी आमदारांचा शेतकरी संघटनेत प्रवेश

Thackeray Group Kolhapur : माजी आमदार उल्हास पाटील आणि सुजित मिणचेकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा हाती घेतला आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Politics : महाविकास आघाडीकडून माजी आमदार उल्हास पाटील आणि सुजीत मिणचेकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा हाती घेतला आहे. यावेळी स्वाभिमानीकडून उल्हास पाटील हे शिरोळ विधानसभेतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तर सुजित मिणचेकर हे हातकणंगले विधानसभा मतदार संघातून अर्ज दाखल करणार आहेत. माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार उल्हास पाटील तब्बल दहा वर्षांनंतर शिरोळच्या मैदानात एकत्र दिसणार आहेत.

महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारल्यानंतर माजी आमदार उल्हास पाटील यांनी थेट नाराजी व्यक्त केली. गतवेळच्या निवडणुकीत तालुक्यातील कोणत्याही नेत्यांच्या पाठबळाशिवाय जवळपास ६१ हजार मते त्यांनी घेतली होती. स्वाभिमानीकडून उल्हास पाटील यांना प्रस्ताव दिल्यानंतर त्यांनी तो स्विकारून स्वाभिमानीमार्फत शिरोळची निवडणूक लढविण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या शिरोळ येथील निवासस्थानी सोमवारी (ता.२८) रात्री उशिरा झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत उल्हास पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली.

कारखानदार विरुद्ध शेतकरी संघटना

शिरोळ तालुक्याला शेतकरी चळवळीची पार्श्वभूमी आहे. शेतकरी प्रश्नावर राजू शेट्टी यांनी आमदारकी, खासदारकी तर शेतकरी चळवळीच्या मुशीतून तयार झालेल्या उल्हास पाटील यांनीदेखील आमदारकी मिळवली. शेतकरीविरुद्ध कारखानदार या संघर्षातच या दोघांनी आमदारकी, खासदारकी गाजवली आहे.

जरांगे पाटील यांची तोफ धडाडणार

राजू शेट्टी आणि उल्हास पाटील या दोघांचेही घनिष्ठ संबंध असणाऱ्या मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी शेट्टी आणि पाटील या दोघांनीही चर्चा करून येणाऱ्या काळात प्रचारासाठी निमंत्रित केले. जरांगे पाटील यांनीही शिरोळमध्ये येण्याची ग्वाही दिल्याने जरांगे पाटील यांची तोफ शिरोळच्या आखाड्यात धडाडणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT