Mumbai News: सत्तेत येण्यापूर्वी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करावीत या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.
५ ते १२ जूनदरम्यान मराठवाड्यातील जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांसमोर निदर्शने केली जाणार आहेत. मोर्चा, चक्का जाम, गावपातळीवर बैठका आणि वाजतगाजत सत्ताधारी गटांच्या नेत्यांना ‘क्या हुआ तेरा वादा’ असे म्हणत निवेदन देण्यात येणार आहे.
या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी बुधवारी (ता. ४) मुंबईत शिवसेना भवनात शिवसेना नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला मराठवाड्यातील उपनेते, जिल्हाप्रमुख उपस्थित होते. या बैठकीत शिवसेना ज्येष्ठ नेते विश्वनाथ नेरुरकर, चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख व उपनेते विनोद घोसाळकर, विधा नपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार कैलास पाटील यांनी मार्गदर्शन केले.
५ जून रोजी तलाठी, ग्रामविकास अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. ६ व ७ जून रोजी सत्ताधारी पक्षांचे आमदार, खासदार आणि मंत्र्यांना पारंपरिक वाद्याच्या गजरात ‘क्या हुआ तेरा वादा’ असे विचारत ८, ९ आणि १० जून रोजी खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख यांच्या प्रत्येकी पाच गावांत ३ दिवस गावबैठका घेण्यात येणार आहेत. ११ जून रोजी तालुकास्तरावर बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच १२ जून रोजी जिल्ह्याच्या ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.
याचा विचारणार जाब
- शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या
- शेतकरी सन्मान योजनेतून १५ हजार द्या
- लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये कधी देणार
- ४५ हजार गावांत पाणंद रस्ते बांधणे
- शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतांवरील एसजीएसटी अनुदान स्वरूपात परत करणे
- एक रुपयात पीक विमा द्या
- वृद्धांना २१०० रुपये पेन्शन द्या
- अन्नदाता बनेल उर्जादाता : शेतीला २४ तास वीज हवी
- शेतीमालाला हमीभाव द्या
- बी बियाणे-खतांच्या किमती नियंत्रित ठेवा
- मराठवाडा वॉटर ग्रीडला केंद्राकडून मान्यता द्या
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.