Ravikant Tupkar
Ravikant TupkarAgrowon

Farmer Lon Waiver Protest : कर्जमुक्ती, उर्वरित पीकविम्यासाठी राज्यभर आंदोलन ः तुपकर

Agriculture Loan Waiver : सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. शेतकरी संकटात असताना सरकार झोपेचे सोंग घेत आहे. पण आम्ही शेतकरी या देशाची भूक भागवणारे आहोत.
Published on

Buldana News : सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. शेतकरी संकटात असताना सरकार झोपेचे सोंग घेत आहे. पण आम्ही शेतकरी या देशाची भूक भागवणारे आहोत. आमच्या हक्कांसाठी आता तडजोड करणार नाही. शासनाला जागे करण्यासाठी कर्जमुक्ती, उर्वरित पीकविम्यासाठी राज्यभर आंदोलन करून शेतकऱ्यांचा गगनभेदी आवाज करू, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला.

मलकापूर तालुक्यातील जांभूळधाबा (ता. मलकापूर) येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित एल्गार मेळाव्यात तुपकर बोलत होते. या वेळी त्यांनी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांवर कडाडून टीका केली. ‘शासन जर शेतकरी शेतमजूर आणि सर्व सामान्यांचे प्रश्न दुर्लक्षित करणार असेल, तर रस्त्यावरून दिल्लीपर्यंतचा आवाज बुलंद केला जाईल. हा फक्त एल्गार नाही तर हे निर्णायक संघर्षाचे रणशिंग आहे,’ असा इशारा या वेळी त्यांनी दिला.

Ravikant Tupkar
Loan Waive Scheme : कर्जमुक्तीची २५ हजारांवर शेतकऱ्यांना प्रतीक्षा

या वेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अमोल राऊत, सचिन शिंगोटे, गजानन भोपळे, हर्षल मोरे, अमोल मोरे, आकाश माळोदे, नीलेश गवळी, उमेश राजपूत, बंडू देशमुख, परमेश्वर मोरे, निखिल पाटील, रामा गावंडे, प्रतिक पाटील, धनराज पाटील, कुशल सोनवणे, महादेव मोरे, सारंग झांबरे, पवन चोपडे, अविनाश वाघोदे, संदीप कुंबेथोप, उमेश सपकाळ, नरेश इंगळे, समाधान कुयटे, राहुल पाटील, गणेश दीक्षित, विठ्ठल गायकवाड, गणेश गायकवाड यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Ravikant Tupkar
Farmer Loan Waive : जायकवाडी ऊर्ध्व धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या

कर्जमाफीचे काय?

घोषणाबाजी करायची आणि अंमलबजावणी शून्य, पीकविमा कुठे गेला, पावसाळा बघायची वेळ आली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात अजून एक रुपयाही नाही, पर्जन्यमापक यंत्रे फसवतात आणि विमा कंपन्या गोंधळात गाडून टाकतात, हे सर्व किती दिवस सहन करायचे असा प्रश्‍नही रविकांत तुपकर यांनी विचारला.

एकिकडे फळबागा लावायला सरकार सांगते, पण फळबागांचा पीकविम्यात समावेश नाही हे धोरण कसे आहे? शेतीमालाला हमीभाव नाही, नुकसान भरपाई मिळत नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी कोणतीच उपाययोजना नाही तर दुसरीकडे शेतकरी पुत्रांच्या हाताला काम नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com