Market Committee Election Agrowon
ॲग्रो विशेष

Shirur Co-operative Election: शिरूर खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीसाठी ११२ अर्ज

Election Update: तालुका खरेदी-विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १७ जागांसाठी ११२ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती शिरूर सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांनी दिली.

Team Agrowon

Shirur News: तालुका खरेदी-विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १७ जागांसाठी ११२ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती शिरूर सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांनी दिली.

रांजणगाव गटातून राजेंद्र नरवडे यांचेच चार उमेदवारी अर्ज आल्याने ही जागा बिनविरोध झाली आहे. अडीच वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रलंबित असणारी ही निवडणूक लागल्याने विधानसभा निवडणुकीनंतर सहकार खात्याच्या या पहिल्या निवडणुकीस महत्त्व प्राप्त झाले आहे.

अद्याप महाविकास आघाडी किंवा माहिती यांच्याकडून या निवडणुकीसाठी रणसिंग फुंकले नसले तरी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी या निवडणुकीवर पॅनलचा शिक्कामोर्तब होईल.

उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी (ता. ११) शेवटचा दिवस होता. त्यामुळे शिरूर तहसील कार्यालय आवारात उमेदवार प्रतिनिधींनी मोठी गर्दी केली होती. बुधवारी (ता. १२) उमेदवारी अर्जांची छाननी शिरूर सहायक निबंधक यांच्या कार्यालयात झाली.

तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २७ फेब्रुवारी असून, २८ रोजी चिन्हवाटप, तर ९ मार्चला सकाळी ८ ते सायंकाळी ४ पर्यंत खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीसाठी मतदान होईल. ९ मार्चला मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासाने त्याच ठिकाणी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकालही घोषित करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT