Vighnahar Sugar Factory Election: ‘विघ्नहर’मध्ये महाविकास आघाडी की बिघाडी?

Election Update: पुणे जिल्ह्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने राजकीय वातावरण तापवले आहे. महाविकास आघाडीतील तडजोडींच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध होणार की थेट सामना रंगणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Vighnahar Sugar Factory
Vighnahar Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on

Pune News: पुणे जिल्ह्यातील सर्वांत चांगल्या कामकाजासाठी नावाजलेल्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. ही निवडणूक महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना मानाचे पान देत, बिनविरोध होणार की निवडणूक होणार हे अर्ज माघारीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

तर महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाला विधानसभा निवडणुकीत केलेल्या तडजोडीतील कमाल जागा मिळणार की पुन्हा एकदा शिवसैनिकांच्या तोंडाला पाने पुसली जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, या निवडणुकीचे पडसाद आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये उमटणार आहेत.

Vighnahar Sugar Factory
Vighnahar Cooperative Sugar Factory : ‘विघ्नहर’च्या ऊस धोरणाची १ जूनपासून अंमलबजावणी

‘विघ्नहर’ची स्थापना काँग्रेसचे माजी खासदार दिवंगत निवृत्तीशेठ शेरकर यांनी केली. या कारखान्यावर बंधू दिवंगत सोपान शेरकर आणि विद्यमान अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या माध्यमातून पारंपरिक काँग्रेसच्या ताब्यात राहिला. मात्र विधानसभा निवडणुकीत आमदारकीचे स्वप्न अजमावण्यासाठी सत्यशील शेरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरदचंद्र पवार गट) प्रवेश करत निवडणूक लढविली.

मात्र त्यांना या निवडणुकीत अपयश आले. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पारंपरिक मतदार संघ म्हणून शड्डू ठोकत, शेरकर यांच्या उमेदवारी समोर आव्हान उभे केले होते. मात्र महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत ‘तडजोड’ होऊन, विघ्नहरच्या संचालक मंडळामध्ये मानाचे पान दिले जाईल, असे आश्‍वासन देण्यात आले होते.

Vighnahar Sugar Factory
Maharashtra Cooperative Elections: विघ्नहर साखर कारखाना निवडणुकीची रणधुमाळी सुरू

विधानसभा निवडणुकीत सत्यशील शेरकर यांचा पराभव होऊन अनपेक्षितरीत्या शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) बंडखोर अपक्ष उमेदवार शरद सोनवणे विजयी झाले. तसेच आमदार अतुल बेनके यांचा पराभव झाला. या विधानसभा निवडणुकांचे पडसाद ‘विघ्नहर’ निवडणुकीत उमटण्याची चिन्हे आहेत.

आढळराव यांचा शेरकर यांना पाठिंबा

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या दोन निवडणुकांमध्ये सत्यशील शेरकर यांनी खासदार अमोल कोल्हे यांचा हिरिरीने प्रचार केला होता. मात्र तरीही आढळराव यांनी ‘विघ्नहर’च्या कामकाजाचे कौतुक करत, शेरकर यांना पाठिंबा दिला. आढळराव पाटील हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) सक्रिय आहेत.

शिवसेनेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याचा भाजप कार्यकर्त्यांसाठी आग्रह

विधानसभा निवडणुकीच्या तडजोडीत शिवसेनेला किमान ५ जागा मिळाव्यात असे ठरले होते. मात्र अद्याप शिवसेनेला विश्‍वासात घेतले गेले नाही. शिवसेना पदाधिकाऱ्यांची शेरकर यांच्यासमवेत बैठक झाल्याचे समजते. या बैठकीत शिवसेनेला एकच जागा मिळणार असल्याचे समजते. तर दुसरी जागा भाजपचे पदाधिकारी असलेल्या एका कार्यकर्त्याला शिवसेनेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याच्या आग्रहामुळे दिली जाणार असल्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com