Maharashtra Cooperative Elections: विघ्नहर साखर कारखाना निवडणुकीची रणधुमाळी सुरू

Sugar Factory Election Update: ग्रामीण भागागातील सहकाराच्या निवडणुकांचा हंगाम सुरू झाला असून, जुन्नर येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी (ता. १०) जाहीर झाला आहे.
Maharashtra Cooperative Elections
Maharashtra Cooperative ElectionsAgrowon
Published on
Updated on

Pune News: ग्रामीण भागागातील सहकाराच्या निवडणुकांचा हंगाम सुरू झाला असून, जुन्नर येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी (ता. १०) जाहीर झाला आहे. इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल होण्यास प्रारंभ झाला असून, गेल्या दोन दिवसांत ८३ अर्जांची विक्री झाली असून, विविध अर्ज दाखल झाले आहेत.

शुक्रवारी (ता. १४) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून, कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी पहिल्याच दिवशी उत्पादक सभासद प्रतिनिधी मतदार संघाच्या शिरोली बुद्रुक गटातून अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.

Maharashtra Cooperative Elections
Khed Co-op Society Election: खेड खरेदी-विक्री संघ निवडणुकीत रंगत! १८ जागांसाठी ५९ अर्ज दाखल

अर्जांची छाननी सोमवारी (ता. १७) होणार आहे. माघारीची मुदत ४ मार्चपर्यंत असून ५ मार्चला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. मतदान १५ मार्चला सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत असून, मतमोजणी १६ मार्चला होणार आहे.

संचालक मंडळाच्या २१ जागा

विघ्नहर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या एकूण २१ जागा आहेत. यात उत्पादक सभासद मतदार संघाच्या जुन्नर, शिरोली बुद्रुक, पिंपळवंडी व घोडेगाव गटातून प्रत्येकी तीन तर ओतूर गटातून चार, असे एकूण १६ संचालक तसेच अनुसूचित जाती/जमाती एक प्रतिनिधी, महिला राखीव प्रतिनिधी दोन, इतर मागासवर्गीय एक प्रतिनिधी, भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्गातील एक प्रतिनिधी अशा एकूण २१ संचालकांच्या जागांसाठी निवडणूक होत आहे.

Maharashtra Cooperative Elections
Sugar Factory Election : वसंतदादा कारखाना निवडणूकीसाठी २१ जागांकरिता १४४ अर्ज दाखल

दाखल झालेल्या अर्जांमध्ये उत्पादक सभासद प्रतिनिधी मतदार संघांच्या शिरोली बुद्रुक गटातून जालिंदर ढोमसे, पिंपळवंडीतून संभाजी पोखरकर, धनंजय लेंडे, संजय भुजबळ व इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी मतदार संघातून विजयकुमार आहेर, नीलेश भुजबळ, भगवान घोलप यांनी अर्ज दाखल केले. तर शेतकरी संघटनेचे अंबादास हांडे यांनी उत्पादक सभासद प्रतिनिधी मतदार संघांच्या पिंपळवंडी गटातून अर्ज दाखल केला.

महाविकास आघाडीतील पक्षांना संधी मिळणार का?

‘विघ्नहर’चे विद्यमान अध्यक्ष सत्यशिल शेरकर हे मूळचे काँग्रेसचे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात प्रवेश करून, जुन्नर विधानसभा निवडणूक लढविली. मात्र या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने प्रबळ दावा करत शड्डू ठोकला होता. मात्र राजकीय तडजोड करत शिवसेनेला संचालक मंडळात जास्तीत जास्त जागांवर स्थान दिले जाईल, असा शब्द दिला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र आता शिवसेनेला मानाने पान मिळते की तोंडाला पाने पुसली जातात, हे औत्सुक्याचे ठरले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com