Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : ...ती गॅरेंटी नाही, शेतकऱ्यांची अवस्थाही चिंताजनक; शरद पवार यांची टीका

Sharad Pawar On farmers Issue : अवकाळी, कमी पाऊस आणि दुष्काळ यामुळे शेतकऱ्याची अवस्था दयनीय झाली आहे. मात्र यावर सरकारची कोणतीच भूमिका स्पष्ट नसून पंतप्रधान मोदी यांची गॅरेंटी खोटी असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Nashik News : पंतप्रधान मोदी यांच्या अनेक घोषणांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जोरदार निशाना साधला आहे. त्यांनी, 'पंतप्रधान मोदी हे सतत आपल्या गॅरेंटीबाबत बोलत असतात. मात्र त्यांची गॅरेंटी खोटी', असल्याची टीका केली आहे. ही टीका त्यांनी नाशिक येथे गुरूवारी (ता. ४ रोजी) राष्ट्रवादीच्या शिबीरात केली आहे.

शरद पवार यांनी, 'मोदी यांनी २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट करू अशी घोषणा केली होती. मात्र हे २०२४ आहे, शेतकऱ्यांच्या हाती काहीच आलेलं नाही. त्यांच्या या घोषणेत काहीच तथ्य नाही असे म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांची गॅरेंटी ही काही खरी नाही. याचा अनुभव अनेक वेळेला आला', असल्याचेही पवार म्हणालेत.

'देशातील नवीन पिढी अस्वस्थ असून ती काम मागत आहे. पण त्यांच्या हाताला काम मिळत नाही. देशाची अर्थव्यवस्था अत्यंत महत्वाची असल्याची पवार म्हणाले. तसेच 'मोदी यांनी, देशाची अर्थव्यवस्था २०२४-२०२५ पर्यंत ५ लाख कोटीवर घेऊन जाऊ असेही म्हटले होते. पण तेही ते करू शकलेले नाहीत. तर ही अर्थव्यवस्था पाच लाखाच्या पन्नास टक्क्यापर्यंत सुद्धा पोहचलेली नसल्याची', टीका पवार यांनी केली आहे.

यावेळी पवार म्हणाले, 'देशातला शेतकरी हा अन्नदाता आहे. तोच आता अडचणीत आहे. अवकाळी, कमी पाऊस, यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांच्या जमिनी विकासासाठी काढून घेतल्या जात आहेत. धरणात, एमआयडीसह विकासासीठी शेतीच्या जमिनी घेतल्या जात आहेत. यामुळेच जमिनीचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांची अवस्थाही आज चिंताजनक झाली आहे'.

त्यामुळे शेतीवरचा बोजा कमी करायला हवा, नवी धोरणं आखायला हवीत. शेतीसाठी निर्णय घ्यायला हवेत. शेतीला नवे पर्याय द्यायला हवेत. पण आज उलट होतं आहे. जो पिकवतोय त्याच्या पिकाची किंमत कमी केली जात असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: अतिवृष्टीची मदत मंजूर; परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १२८ कोटी रुपये वाटण्यास मान्यता

Wild Vegetable Festival : नैसर्गिक रानभाजी महोत्सवाने पेसा गावात निसर्गाचा सन्मान

Janjira Fort Jetty : जंजिरा जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच खुली होणार

Crop Damage Compensation : पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त पावसाच्या मंडलात भरपाईचे प्रयत्न

Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणारच

SCROLL FOR NEXT