Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

Sharad Pawar : शेतकरी आक्रोश मोर्चाचा शनिवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप

Shetkari Akrosh Morcha : पुणे जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात २७ ते ३० डिसेंबर दरम्यान काढण्यात येणाऱ्या मोर्चाची तयारी पूर्ण झाली आहे.
Published on

Pune News : पुणे जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात २७ ते ३० डिसेंबर दरम्यान काढण्यात येणाऱ्या मोर्चाची तयारी पूर्ण झाली आहे. शेतकरी विरोधी धोरण राबविणाऱ्या व शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारच्या विरोधातील शेतकरी आक्रोश मोर्चाची सुरुवात शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यापासून होणार आहे.

तर समारोप शनिवारी (ता. ३०) जिल्हाधिकारी कार्यालयावर होणार आहे. समारोपाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी व श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली.

Sharad Pawar
Sharad Pawar : कांदाप्रश्‍नी शरद पवार उतरणार रस्त्यावर

पत्रकार परिषदेला शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे तालुकाप्रमुख माउली खंडागळे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे तालुकाध्यक्ष तुषार थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव चौगुले, शिवसेनेचे जिल्हा संघटक संभाजी तांबे, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, गुलाब पारखे, तुळशीराम भोईर, विजय कुऱ्हाडे, दिलीप बाह्मणे, मंगेश काकडे, देवराम नांगरे, शाम माळी, मोहन बांगर, संतोष जाधव तसेच महाविकास आघाडीतील पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Sharad Pawar
Sharad Pawar : शरद पवार यांच्याकडून साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांच्या जुन्या आठवणींना उजाळा

शिवसेनेचे तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे म्हणाले, की शेत मालाला बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकरी प्रश्नावर संसदेत चर्चा व्हावी, अशी मागणी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, संजय राऊत तसेच अन्य खासदारांनी केली असता त्यांना निलंबित करण्यात आल्याने शेतकरी प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी शेतकरी आक्रोश मोर्चा जुन्नर, ओतूर, आळेफाटा, नारायणगाव, कळंब, मंचर, राजगुरुनगर, चाकण व शिरूर, बारामती व पुणे लोकसभा मतदार संघातून जाणार आहे. मोर्चाच्या अखेरच्या दिवशी ३० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे जाहीर सभेने सांगता होणार आहे.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे, काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे आदी महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याचे शेरकर यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com