Mumbai News: किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य पणन महासंघ आणि राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ या दोन संस्थांमार्फत कार्यरत असलेल्या खरेदी केंद्रांच्या तपासणीसाठी पणन विभागाने पाच सदस्यांची जिल्हानिहाय दक्षता पथके तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. .ही पथके खरेदी केंद्रांकडून खरेदी प्रक्रिया सुरळीत होते की नाही, त्यांच्या कार्यप्रणालीत सुसूत्रता आहे की नाही, योजनेची पारदर्शक अंमलबजावणी, गुणवत्ता या गोष्टींची तपासणी करणार आहे. ही दक्षता पथके खरेदी केंद्रांनी नोंदणी करताना ऑनलाइन सातबारा उताऱ्यानुसार प्रत्यक्ष पीक पेरा नोंदणी तपासली आहे का.MSP Procurement Fraud: बनावट कागदपत्रांद्वारे धान बोनस लाटण्याचा प्रकार उघड.शेतकऱ्याचे आधार कार्ड व बँक खाते तपशील, संस्थेकडे दिवस मशिनची उपलब्धता खरेदी केंद्रांकडे आवश्यक साधन सामग्री यामध्ये ओलावा पडताळणी मशीन, चाळणी, ताडपत्री, इलेक्ट्रिक वजन काटा, संगणक स्कॅनर असलेला स्मार्टफोन, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या शेतीमालाची ऑनलाइन पावती संबंधित शेतकऱ्यास दिली आहे का, वैध इलेक्ट्रिक वजन काटा,.प्रमाणपत्रे, खरेदी केंद्रावर उपलब्ध असलेल्या बारदाना, केंद्र सरकारने निश्चित केलेल्या मानकांनुसार खरेदी होते का, दैनंदिन नोंदी, खरेदी केंद्रांवर शेतकरी अथवा स्थानिक प्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींची दखल घेतली आहे का, खरेदी केंद्रापर्यंत जाण्यासाठीचे रस्ते, तात्पुरती साठवणूक व्यवस्था, पाणपोई आदींची तपासणी करणार आहे..Paddy Procurement: सहकारी सोसायट्यांमार्फत भात खरेदी, शेतकऱ्यांना तत्काळ पैसे, केरळ सरकारचा निर्णय.तसेच खरेदी केंद्रांच्या गोदामाची माहिती गोदामात साठवलेले धान्य शासकीय बारदान्यामध्ये साठवले आहे का, खरेदी केंद्रांकडून गोदामावर आलेला शेतमाल ग्रेडरकडून किती वेळात तपासणी करून साठवणूक करण्यात येतो. गोदामामध्ये शेतीमालाची केंद्र सरकारच्या निकषानुसार साठवणूक केली जाते आहे का, बारदानाचे वजन प्रमाणित केले आहे का, गोदामाचे खरेदी केंद्रापासून अंतर आदी बाबींची तपासणी करण्यात येणार आहे..या तपासणीनंतर पाच दिवसांत विभागीय पुरवठा उपायुक्त अहवाल सादर करतील. त्यानंतर पुढील पंधरा दिवसांत शासनास अहवाल सादर करण्यात येईल.....असे असेल दक्षता पथकया दक्षता पथकाचे प्रमुख सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी असतील. तर निरीक्षण अधिकारी, दोन पुरवठा अधिकारी आणि गोदाम व्यवस्थापक असे चार सदस्य समितीत असतील. हे पथक खरेदी केंद्र, तसेच गोदामांची तपासणी करेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.