Shaktipeeth Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकऱ्यांचे आज आंदोलन

Farmers Protest: परभणी, धाराशिव पाठोपाठ आता बीड जिल्ह्यातील परळी आणि आंबेजोगाई या तालुक्यातील शेतकरी देखील या महामार्गाच्या विरोधात एकवटले असून या महामार्गाच्या विरोधात मंगळवारी (ता. १) कृषिदिनी अंबाजोगाई तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार, असल्याची माहिती किसान सभेचे ॲड. अजय बुरांडे यांनी दिली.

Team Agrowon

Beed News: परभणी, धाराशिव पाठोपाठ आता बीड जिल्ह्यातील परळी आणि आंबेजोगाई या तालुक्यातील शेतकरी देखील या महामार्गाच्या विरोधात एकवटले असून या महामार्गाच्या विरोधात मंगळवारी (ता. १) कृषिदिनी अंबाजोगाई तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार, असल्याची माहिती किसान सभेचे ॲड. अजय बुरांडे यांनी दिली.

पवणार ते पत्रादेवी या शीघ्र दृतगती शक्तिपीठ मार्गास राज्यात शेतकऱ्यांना कडाडून विरोध होत आहे. तरीदेखील राज्य सरकारने हा प्रस्तावित महामार्गास निर्मितीसाठी हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. शक्तिपीठ महामार्गास मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होताना दिसून आहे.

राज्यातील १२ जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गासाठी २७ हजार एकर पेक्षा अधिक शेतजमीन शासन संपादित करणार. हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी भूमिहीन करण्याचे काम सरकार कडून होत असल्याचे लक्षात येताच राज्यात तसेच मराठवाड्यात या महामार्गास तीव्र विरोध होत आहे.

मराठवाड्यातील परभणी, धाराशिव आणि अंबाजोगाई या ठिकाणी शासनाने पोलिसी बळाचा वापर करत शेतकऱ्यांना खोटी प्रलोभने दाखवत सीमांकन करण्याच्या प्रयत्न केल्याचे म्हणणे आहे. अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी, धायगुडा पिंपळा, गीता भारज, नांदगाव, सायगाव इत्यादी गावात शासन करत असलेला बळाचा वापर आणि खोटी प्रलोभने या विरोधात बाधित शेतकऱ्यांची अंबाजोगाई भारज, नांदगाव, येथे बैठका घेतल्या.

या बैठकीत सर्व बाधित शेतकऱ्यांनी या शासनाच्या भूमिकेविरोधात १ जुलै कृषिदिन रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्धार केला. हे रास्ता रोको आंदोलन सर्व ताकदीने यशस्वी करत शक्तिपीठाला जोरदार विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत ॲड.अजय बुरांडे, गजेंद्र येळकर मोहन गुंड, सुशील शिंदे, मारुती इर्लापल्ले, विनायक ढाकणे, तुकाराम शिंदे,जयकिसान मेटे, अजय धायगुडे, रामेश्वर चव्हाण, मुकुंद चव्हाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT