Shaktipeeth Highway
Shaktipeeth HighwayAgrowon

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ मोजणी तूर्त स्थगित

Land Acquistion Protest: शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी येथे येऊन पाठबळ दिले.
Published on

Dharashiv News: शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी येथे येऊन पाठबळ दिले.

शेतकऱ्यांचा विरोध झुगारून महामार्गासाठी सुरू असलेल्या जमिनी मोजणीवर आक्षेप घेतानाच शेतकऱ्यांची गळचेपी करणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना शेट्टी यांनी जाब विचारला. जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. या घडामोडीनंतर जिल्हा प्रशासनाने महामार्गासाठीची मोजणीची प्रक्रिया तूर्त स्थगित केली आहे.

Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाविरोधात १ जुलैला १२ जिल्ह्यांत चक्का जाम आंदोलन

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) अधिकारी मंगळवारी (१ जुलै) जिल्ह्यात येणार असून त्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी दिली.

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासह महामार्गाची मोजणी बंद करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. मागील दोन दिवसांत शेतकऱ्यांनी मोजणीला तीव्र विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर श्री. शेट्टी यांनी गुरुवारी येथे भेट दिली. त्यांनी शेतकऱ्यांसह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. बैठकीत आक्रमक शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.

Shaktipeeth Highway
Shaktipeeth Project Scam: ‘शक्तिपीठ प्रकल्पा’त ५० हजार कोटींचा भ्रष्टाचार; राजू शेट्टींचा आरोप

जिल्हाधिकारी शेतकऱ्यांना नीट वागणूक देत नाहीत. उद्धटपणे वागतात, अशा तक्रारी आहेत. शेतकरी अतिरेकी आहेत का, हे विचारण्यासाठी आलो. पण जिल्हाधिकाऱ्यांनी भेट टाळली. प्रशासनाने आगळीक करू नये. दमन नीती स्वीकारली तर गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

‘सरकारला महामार्ग हवाच असेल तर समुद्रात बांधावा’

‘‘शक्तिपीठ महामार्गाबाबत अनेक गोष्टी अस्पष्ट आहेत. जमीन भूसंपादन आणि त्यासंबंधी कार्यवाहीबाबत प्रशासनालाही काही माहिती नाही. शेतकऱ्यांची दिशाभूल करीत जमीन मोजणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भूसंपादनामुळे शेकडो शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्याचा काही फायदा नाही. तरीही सरकारला महामार्ग हवाच असेल तर समुद्रात बांधावा,’’ असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. बैठकीनंतर मोजणी तूर्त स्थगित केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com