Shaktipeeth Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’चे बागायती, सुपीक भूभाग टाळून आरेखन

Highway Development: महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पास जेथे विरोध होत आहे तेथे नव्याने आरेखन करण्याच्या सूचना शासनामार्फत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास देण्यात आल्या आहेत.

Team Agrowon

Mumbai News: महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पास जेथे विरोध होत आहे तेथे नव्याने आरेखन करण्याच्या सूचना शासनामार्फत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास देण्यात आल्या आहेत. सुपीक व बागायती भूभाग टाळून नव्याने आखणी करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. या महामार्गासाठी ९३८५.३६ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे.

शक्तिपीठ महामार्गाला १२ जिल्ह्यांतून मोठा विरोध होत असून हा महामार्ग रद्दच करा, अशी मागणी होत आहे. हा विरोध लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गाचे आरेखन बदलण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते.

याबाबत महाराष्ट्र समृद्धी महामार्ग व महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग हे समांतर नसून दोन्ही महामार्गामुळे राज्यातील वेगवेगळे जिल्हे द्रुतगती महामार्गाने जोडले जाणार आहेत, असे रस्ते विकास महामंडळाचे म्हणणे आहे. प्रस्तावित महामार्गासाठी २७ हजार एकर भूसंपादन होणार नसून ९३८५.३६ हेक्टर जमीन संपादित करण्याचे नियोजन आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाला विरोध असल्याने भुदरगड, करवीर, आजरा, हातकणंगले, शिरोळ व कागल तालुक्यांतील भूसंपादनाची प्रक्रिया स्थगित केली आहे. त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

आखणीत बदल झाल्यास संपादित क्षेत्रात बदल होऊ शकेल व शेतकऱ्यांच्या संमतीनेच भूसंपादनाचे काम हाती घेण्यात येईल, असेही महामंडळाचे म्हणणे आहे. या आखणीत महामंडळाकडे प्राप्त झालेली सर्व निवेदने व तक्रारी विचारात घेण्यात येणार आहेत, असेही सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या खुलाशात म्हटले आहे, ‘स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार योग्य ते बदल करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. तरी सर्व जनतेने आखणी अंतिम करण्यासाठी व भूसंपादन शीघ्र गतीने करण्यास्तव सहकार्य करावे. महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग बांधकाम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास या प्रकल्पाचा तांत्रिक व वित्तीय सुसाध्यता अहवाल तयार करण्याबाबतचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधदुर्ग या १२ जिल्ह्यांतून पुढे कोकण द्रुतगती महामार्गास गोवा- महाराष्ट्र सरहद्दीवर जोडणे प्रस्तावित आहे. पवनार पत्रादेवी या महाराष्ट्र गोवा हद्दीपर्यंत द्रुतगती महामार्गाच्या (महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग) अंतिम आखणीस शासनाने मान्यता दिली आहे.

या महामार्गाची अंदाजित लांबी ८०२ किलोमीटर आहे. तसेच या प्रकल्पाचा भूसंपादनासह अपेक्षित खर्च ८६ हजार ३५८ कोटी ९० लाख रुपये असून, या प्रकल्पाचे काम ३ वर्षे कालावधीत पूर्ण करणे शक्य आहे. त्यासाठी साधारणतः ९३८५.३६ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे.

या महामार्गामुळे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठे माहूर, तुळजापूर व कोल्हापूर, तसेच अंबाजोगाई ही तिर्थक्षेत्र हे जोडली जाणार असून, संताची कर्मभूमी असलेले मराठीचे आद्यकवी अंबाजोगाईस्थित मुकुंदराज स्वामी, जोगाई देवी तसेच औंढानागनाथ व परळी वैद्यनाथ येथील १२ ज्योतिर्लिंग पैकी दोन ज्योतिर्लिंग व महाराष्ट्राचे आराध्यदैवत पंढरपूर येथील विठ्ठल-रुखमाई मंदिरही जोडले जाणार आहेत. तसेच कारंजा (लाड), माहूर, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर हे दत्त गुरूचे स्थान आदी ठिकाणे जोडली जाणार आहेत.

प्रचंड गोपनीयता

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ सध्या सरकारमधील वजनदार विभाग झाला आहे. शक्तिपीठ महामार्गाबाबत या महामंडळाकडे कोणतीही माहिती विचारली असता अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. तसेच या महामार्गाबाबत प्रचंड गोपनीयता बाळगली जात आहे. जाहीर केलेली माहिती अधिकृत आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता प्रतिसाद दिला जात नाही. एरवी बोलणारे अधिकारी ‘शक्तिपीठ’चे नाव काढले की गप्प होत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT