
Nagpur Goa Shaktipeeth Highway : कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शक्तिपीठ महामार्गाला विरोध आहे. त्यामुळे हा महामार्ग जिल्ह्यात होणार नाही. सांगलीपर्यंत महामार्ग होईल. तेथून पुढे संकेश्वरमार्गे बांद्याला जाईल. त्यामुळे येथे भूसंपादन होणार नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (ता.१४) येथे स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
शक्तिपीठ महामार्गाबाबत राज्य सरकारने पर्यावरण मंत्रालयाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. या पार्श्वभूमीवर मुश्रीफ म्हणाले, ‘‘सांगलीपर्यंत शक्तिपीठ महामार्गाला विरोध नाही. त्यामुळे इथेपर्यंत शक्तिपीठ महामार्ग येणार आहे. तेथून कोल्हापूर- सांगली या नव्या चौपदरी रस्त्यावरून शक्तिपीठ महामार्गावरील वाहने जिल्ह्यात येतील. तेथून संकेश्वर ते बांदा हा नवा महामार्ग झाला आहे. यावरून ही वाहने गोव्याला जातील. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गासाठी जिल्ह्यातील जमीन संपादित केली जाणार नाही.’’ असे मुश्रीफ यांनी सांगितलं.
लाडकी बहीण योजनेबद्दल मुश्रीफ म्हणाले, ‘‘लाडकी बहीण योजनेबद्दल आमचं मत असं होतं की एखाद्या श्रीमंत घरातील महिलांनी अर्ज भरला तर त्यांना कसे पैसे देता येईल? चार चाकी गाडी वगैरे किंवा प्राप्तिकर भरत असतील तर त्यांना पैसे कसे देता येईल? त्यासंदर्भातील नियम अध्यादेशातच आहे. लाडकी बहीण योजनेमधून त्यांच नाव कमी झाले तरी त्यांच्याकडून आधीची वसुली होणार नाही.’’
धनंजय मुंडे प्रकरणाबाबत मुश्रीफ म्हणाले, "मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोप नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईल,’ असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. त्यामुळे यावर वेगळे बोलण्याची आवश्यकता नाही." असे मुश्रीफ यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.