Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गविरोधात २४ जानेवारीला राज्यव्यापी आंदोलन, १२ जिल्ह्यातील शेतकरी एकवटणार

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीनंतर ही शक्तिपीठ महामार्ग रेटण्यासाठी फक्त कोल्हापुरातून विरोध असून, इतर जिल्ह्यांतून विरोध नाही, असा खोटा प्रसार राज्य सरकारकडून केला जात आहे.
Shaktipeeth Highway
Shaktipeeth HighwayAgrowon
Published on
Updated on

Maharashtra Government : शक्तिपीठ महामार्गविरोधात २४ जानेवारीला राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्धार शुक्रवार(ता.१७) करण्यात आला. यावेळी १२ जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचेही ठरले. महामार्गात बाधित होणाऱ्या १२ जिल्ह्यांतील आंदोलक प्रतिनिधींची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे होते.

गिरीश फोंडे म्हणाले की, "विधानसभा निवडणुकीनंतर ही शक्तिपीठ महामार्ग रेटण्यासाठी फक्त कोल्हापुरातून विरोध असून, इतर जिल्ह्यांतून विरोध नाही, असा खोटा प्रसार राज्य सरकारकडून केला जात आहे. यापूर्वी कोल्हापूरसह इतर जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरू होते. आताही सुरू आहे. या सरकारला कंत्राटदारांचे भले करण्यासाठी व उद्योगपतींना नैसर्गिक साधन संपत्ती, खनिज संपत्ती लुटीसाठी हा महामार्ग म्हणजे रेड कार्पेट आहे. असे फोंडे यांनी मत मांडले.

"पर्यावरण विभागांनी ग्राउंड सर्वे करणे गरजेचे असताना एक-दोन दिवसांमध्ये महामार्गाच्या प्रस्तावास कशी मंजुरी देते. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला तसेच पर्यावरण विरोधी शेतकरी विरोधी व जनविरोधी शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी जर शासन जिद्दीस पेटले असेल तर शेतकरी देखील छातीचा कोट करून घाव झेलायला तयार आहे". असे फोंडे म्हणाले.

नांदेडचे गोविंद घाटोळ म्हणाले, "मराठवाडामधील सर्व जिल्हे संघर्ष समितीकडून पिंजून काढण्यात येणार आहे. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत त्यांना भूमिका पटवून देण्यासाठी आम्ही राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. असे घाटोळ यांनी सांगितले.

Shaktipeeth Highway
Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

लातूरचे गजेंद्र येळकर म्हणाले, "स्वतः महायुतीतील अनेक आमदार व खासदार या शक्तिपीठ महामार्ग विरोधात आंदोलनात उतरले होते. परंतु, सरकार आपल्याच आमदार खासदारांचे ऐकत नाही. हे सरकार काही कारभारी मंडळींकडून आदानी, अंबानींसाठी चालवले जाते. पुढील आठवड्यात मुंबईमध्ये बैठक घेऊन प्रसार माध्यमांसमोर सरकारच्या खोट्या कारणाम्याचा पर्दाफास करण्यासाठी एकत्र यायचं आहे. असे येळकर म्हणाले.

या बैठकीस सतीश कुलकर्णी, शांतीभूषण कच्छवे, अभिजित देशमुख, गणेश घोडके, सुभाष मोरलवार, गजानन तीमेवार, केतन सारंग, भारत महाजन, सुदर्शन पडवळ, संभाजी फरताळे, अनिल बेळे, केदारनाथ बिडवे, श्रीधर माने, संतोष ब्याळे, सतीशराव घाडगे, सुनील भोसले, मेहताब पठाण, रवी मगर, परमेश्वर मोठे, बसवराज झुंजारे, नानासाहेब चव्हाण, रामेश्वर चव्हाण, उमेश एडके, प्रकाश पाटील, सुरेश राजापूरकर, आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com