Water Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : शहापूरला भीषण पाणीटंचाईचे संकट

Water Shortage : जानेवारी महिन्यातच पाणीटंचाईचा सामना तालुक्याला करावा लागत आहे. या वर्षी ८ जानेवारीला शहापूर तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली.

Team Agrowon

Khardi News : मुंबई महानगरीला पाणीपुरवठा करणारा आणि ठाणे जिल्ह्यातील सर्वांत जास्त धरणे असलेला तालुका अशी शहापूरची ओळख आहे. मात्र, जानेवारी महिन्यातच पाणीटंचाईचा सामना तालुक्याला करावा लागत आहे. या वर्षी ८ जानेवारीला शहापूर तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली.

२३ फेब्रुवारीपर्यंत सहा गावे आणि १९ पाड्यांना १० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अजून ९ गावे आणि ४३ पाडे मिळून ५२ गाव-पाड्यांना १५ टँकरची मागणी आहे. याबाबतचा प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पडून असल्याने या गावांना टँकरची प्रतीक्षा आहे.

शहापूर तालुक्यात दरवर्षी भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत आहे. त्यात टंचाईग्रस्त गावा-पाड्यांची संख्याही वाढत आहे. तालुक्यातील पहिला पाण्याचा टँकर कसारा खु ग्रामपंचायतीमधील नारळवाडी व पारधीवाडी, चिंतामणवाडी, बिवलवाडी, दांड, या ठिकाणी सुरू झाला. त्‍यानंतर फुगाळे, अघाणवाडी, धामणी ग्रामपंचायतीमधील भुईपाडा;

तसेच कळभोंडे, कोथले, अजनूप ग्रामपंचायतीमधील कोळीपाडा, वारळीपाडा, उठावा, वारेपाडा, भाकरेपाडा, वरचा गायदरा, बोंडारपाडा, भस्मेपाडा, कोठारे ग्रामपंचायतीमधील कोळीपाडा, विहिगाव ग्रामपंचायतीमधील तेलमवाडी, कातवारवाडी, वाशाला बुमधील राईची वाडी, वेळूकमधील खरमेपाडा; तसेच माळ ग्रामपंचायत या ठिकाणी १० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

शहापूर तालुक्यातील ५२ गावांतील पाड्यात तीव्र पाणीटंचाई असल्याने येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा; अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.
गणेश राऊत, तालुका विस्तारक, ठाकरे गट शिवसेना
वाढीव टँकरची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. टॅंकर उपलब्ध झाल्यावर मागणी असलेल्या ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात येईल.
किशोर गायकवाड, मुख्य लेखापाल, पाणीपुरवठा विभाग, शहापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT