Chh. SambhajinajiNagar News : मराठवाड्यात सध्या १८४ गावे आणि ५५ वाड्या मिळून २३९ गावांममधील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर शिवाय पर्याय नाही. त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे ११ शासकीय व २९० खासगी मिळून ३०१ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना व नांदेड जिल्ह्यांत टंचाईची तीव्रता इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे.
माहितीनुसार, यंदा मार्चपासून पाणीटंचाई जाणवायला सुरवात झाली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत पाणीटंचाई जाणवते आहे. सद्यःस्थितीत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तब्बल १४९ गाव-वाड्यामध्ये पाणी संकट भीषण बनली आहे.
१९८ टँकर या टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात ४४ गावे आणि १४ वाड्यांना टंचाईचे संकट जाणवते आहे. या गाव वाड्यांना ८० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, नांदेड जिल्ह्यात ४ गावे आणि १५ वाड्यात १४ टँकर पाणीपुरवठा करण्यासाठी फेऱ्या मारत आहेत.
परभणी जिल्ह्यात एका गावात एक टॅंकर सुरु आहे. हिंगोली जिल्ह्यात २ गावामध्ये एक टॅंकर, बीड जिल्ह्यात १ गाव आणि ५ वाड्यांमध्ये दोन टॅंकर, लातूर जिल्ह्यात एक वाडी आणि एका गावात एक तर धाराशिव जिल्ह्यातील दोन गावांमध्ये चार टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असल्याचे विभागीय आयुक्तालयाच्या अहवालात म्हटले आहे.
४९२ विहिरींचे अधिग्रहण
मराठवाड्यात जिल्हा प्रशासनाकडून टँकर व टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी ४९२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यापैकी १६३ विहिरी टॅंकरसाठी तर ३२९ विहिरी टॅंकरशिवायच्या पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी या विहिरीतील पाणी टँकर भरण्यासाठीही वापरले जात आहे.
जिल्हानिहाय अधिग्रहित विहिरींची संख्या
छत्रपती संभाजीनगर १५४
जालना १००
परभणी ०९
हिंगोली ५३
नांदेड १००
बीड ३६
लातूर २९
धाराशिव ११
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.