Agriculture Well Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Well : ‘मनरेगा’तून बारा वर्षांत सात हजार विहिरी पूर्ण

MGNREGA Scheme : पाच एकराच्या आतील शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून बारा वर्षांत १२ हजार १३७ विहिरी मंजूर झाल्या.

Team Agrowon

Nagar News : पाच एकराच्या आतील शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून बारा वर्षांत १२ हजार १३७ विहिरी मंजूर झाल्या. त्यातील सात हजार विहिरींची कामे पूर्ण झाली, मात्र तब्बल पाच हजार १७१ कामे अपूर्ण आहेत. बारा वर्षांत विहिरींपोटी २०० कोटींपेक्षा अधिक अनुदान शेतकऱ्यांना मिळाले आहे.

शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा व्हावी, रोजगारही उपलब्ध व्हावा, यासाठी पाच एकर क्षेत्राच्या आतील शेतकऱ्यांना ‘मगांराग्रारोहयो’मधून २०११-१२ पासून सिंचन विहिरी दिल्या जातात. पूर्वी या विहिरींसाठी ३ लाखांचे अनुदान दिले जायचे. २०२२ पासून चार लाखांचे अनुदान दिले जात आहे. अकोले तालुक्यात ५८७ विहिरींना मंजुरी मिळाली.

त्यातील ५६६ पूर्ण झाल्या. जामखेडला ४ हजार ११३ पैकी ८९६, कर्जतला १२१४ पैकी ७९१, कोपरगावला ५३९ पैकी ४४०, नगरला ३८७ पैकी २९५, नेवाशाला २०३ पैकी १९६, पारनेरला ११८८ पैकी १०७०, पाथर्डीला १२२८ पैकी ८२८, राहात्याला २४५ पैकी २४४, राहुरीला २५६ पैकी २२१, संगमनेरला ५५९ पैकी ४३३, शेवगावला ८७५ पैकी ५५९, श्रीगोंद्याला ४८७ पैकी ४१२, श्रीरामपुरला ९३ पैकी ७१ विहिरींची कामे मंजूर झाली आहेत. चालु वर्षांत ८३० कामे सुरू होऊन त्यातील ३० कामे पूर्ण झाली आहेत.

जामखेड-कर्जतला चौकशी

जिल्ह्यात सर्वाधिक ३ हजार ४१६ विहिरींची कामे एकट्या जामखेड तालुक्यातील तर कर्जतला ५१३ विहिरींची कामे अपूर्ण आहेत. जामखेडमध्ये मागील काळात नियम तोडून सिंचन विहिरींची कामे मंजूर केल्याची तक्रार आहे. त्यानुसार मंजूर विहिरींच्या तसेच अन्य बाबींची चौकशी केली जात आहे. संबंधितांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे खुलासे दिले आहेत. त्याबाबत पूर्णतः गुप्तता बाळगली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Politics : जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र; ६ आमदार साखर कारखानदार

Maharashtra Cabinet : पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाण्याला मंत्रिपदाची आस

Vijay Wadettiwar : महायुती जिंकली अभिनंदन! पण, नवे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते? यावर आमचे लक्ष असेल; वडेट्टीवार यांचा इशारा

Sweet Sorghum Ethanol : गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा खोडा?

Onion Market : हंगाम बदल, कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना

SCROLL FOR NEXT