MGNREGA Worker
MGNREGA Worker Agrowon

MGNREGA : नांदेडमध्ये ‘रोहयो’च्या कामांचे ९९ कोटी थकले

Employment Wages : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात गेल्या साडेतीन महिन्यांपासून केलेल्या कामाचा मोबदला न मिळाल्याने रोहयो मजुरांमध्ये नाराजी आहे.
Published on

Nanded News : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात गेल्या साडेतीन महिन्यांपासून केलेल्या कामाचा मोबदला न मिळाल्याने रोहयो मजुरांमध्ये नाराजी आहे. जिल्ह्यात मागील साडेतीन महिन्यात (एक एप्रिल ते १५ जुलै) ३० लाख ६१ हजार मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाला आहे.

यात मजुरांची ८९ कोटी ३२ लाख रुपयांची मजुरी प्रलंबित आहे. तर मागील वर्षातील १०९० वैयक्तिक कामातील कुशल प्रकरणात नऊ कोटी ५९ लाख रुपये असे एकूण ९८ कोटी ८६ लाख रुपये थकले आहेत.

MGNREGA Worker
MGNREGA Wage : नाशिक जिल्ह्यात रोहयोअंतर्गत मजुरांचे ११ कोटी थकले

जिल्ह्यात ‘रोहयो’अंतर्गत पाच यंत्रणांच्या माध्यमातून कामे करण्यात येत आहेत. यात ग्रामपंचायत, वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग व रेशीम विभागाचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या ‘रोहयो’अंतर्गत एक लाख १५ हजार ९९८ जॉब कार्डधारक आहेत. यात एक लाख ९१ हजार ९१३ रोजगारांचा समावेश आहे.

MGNREGA Worker
MGNREGA Labor : नगर जिल्ह्यात रोहयोवर १७ हजार १४६ मजूर

जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामावर भर देऊन नागरिकांना रोजगार देण्यात येत आहे. ‘रोहयो’ची ही कामे ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. यासह कृषी विभाग, रेशीम विभाग, वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागात रोजगार हमी योजने अंतर्गत कामे करण्यात आली आहेत. काम केलेल्या नोंदणीकृत मजुरांच्या बँक खात्यावर शासनाकडून एकही रुपया जमा करण्यात आला नाही. विशेष म्हणजे मजुरांच्या मजुरीचे पैसे अदा करण्यासाठी शासनाकडून निधी नसल्याने प्रशासकीय यंत्रणाही हतबल झाली आहे.

योजनेच्या अंमलबजावणीवर परिणाम

जिल्ह्याच्या सोळाही तालुक्यांत रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड, रोपवाटिका, जनावरांचा गोठा, सिंचन विहीर, शेततळे, तुती लागवड, रस्ते अशी विविध कामे केली जातात. कुशल व अकुशल कामांचा निधी प्राप्त होत नसल्याने या योजनेच्या अंमलबजावणीवर परिणाम झाला आहे. ‘रोहयो’अंतर्गत ५० टक्के कामे ग्रामपंचायतस्तरावर व ५० टक्के कामे यंत्रणा स्तरावर केली जातात. यातील कुशल कामे ४० टक्के व अकुशल कामांचे प्रमाण ६० टक्के ठेवणे बंधनकारक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com