Jal Jeevan Mission : जळकोट तालुक्यात जल जीवन मिशनची ४८ कामे मंजूर

Water Supply Scheme : ३८ कामे नळयोजना बळकटीकरण, १० कामे गावातील नळयोजना कनेक्शनची असून, ३३ कोटी ६८ लाख रुपयांचा आराखडा मंजूर असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता वीरभद्र स्वामी यांनी दिली.
Jal Jeevan Mission
Jal Jeevan MissionAgrowon

Latur News : जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची ४८ कामे मंजूर आहेत. ३८ कामे नळयोजना बळकटीकरण, १० कामे गावातील नळयोजना कनेक्शनची असून, ३३ कोटी ६८ लाख रुपयांचा आराखडा मंजूर असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता वीरभद्र स्वामी यांनी दिली.

तालुक्यात ही कामे सुरू आहेत. सद्यःस्थितीत ३८ कामे प्रगतिपथावर आहेत. तर ५ गावात पाणीपुरवठा सुरू झाला आहे. यात रामपूर तांडा, डोंगरेवाडी तांडा, लाळी, बोरगाव, यलदरा या गावांचा समावेश आहे.तर लाळी बुद्रुक, शेलदरा, येवरी, सोनवळा, हाळदवाढवणा, तसेच पाटोदा खुर्द, पाटोदा बुद्रुक, बेळसांगवी, गुत्ती, मरसांगवी, मंगरूळ येथील काम प्रगतिपथावर आहे.

Jal Jeevan Mission
Jal Jeevan Mission : ऑनलाईन नळजोड नोंदी ठरताहेत डोकेदुखी

कामासंदर्भात कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार यांनी जळकोट येथे बैठक घेऊन जळकोटमधील पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण कराव्यात व नागरिकांना पाणीटंचाई जाणवणार नाही. याची काळजी घ्यावी अशा सूचना दिल्या होत्या.

Jal Jeevan Mission
Jal Jeevan Mission : आंबेगाव तालुक्यातील ‘जलजीवन’ची कामे रखडली

तालुक्यामध्ये जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेची कामे तातडीने पूर्ण व्हावीत यासाठी जळकोट येथील गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपअभियंता वीरभद्र स्वामी यांच्यासह शाखा अभियंता गुरुलिंग मठपती, व्ही. जी. माने, एस. जी. शेळके, लक्ष्मण ढोबळे, शरद सोनकांबळे आदी पुढाकार घेत आहेत.

तालुक्यात गावनिहाय मंजूर रक्कम कंसात रक्कम (लाखांत)

अतनूर (१०९.४८ लाख), बेळसांगवी (१३८.२७), बोरगाव (३२.९), चिंचोली (४९.६८), धामणगाव (९८.१६), ढोरसांगवी (६१.२६), डोंगरगाव (४७.८९), एकुर्का खुर्द (३८.४५), गव्हाण (७८.०५), धोंडवाडी (२९.०४), गुत्ती (१७७.९५), हाळदवाढवणा (७१.०२), डोमगवा (८.०२), हावरगा (५.०२), जिरगा (१८.४३), होकर्णा (६९.०६), जगळपूर (९.०२), करंजी (३३.१६), केकतसिंदगी (९०.८८), कोळनूर (९४.०६),

डोंगरकोनाळी (४६), कुणकी (१००.०८), लाळी बुद्रुक (६५.५३), लाळी खुर्द (१५.०३), माळहिप्परगा (२७७.३३), मरसांगवी (९९.२८), पाटोदा खुर्द (१९९.७८), पाटोदा बुद्रुक (६५.६९), रावणकोळा (२.६५), शेलदरा (५५.५१), सोनवळा (१६४.०६), सुल्लाळी (६४.८३), तिरुका (९९.०२), उमरदरा (८९.०९), उमरगा रेतू (०.९९), विराळ (७०.२६), वांजरवाडा (१३.०४), येलदरा (१४.५२), येवरी (६०.०२), रामपूर तांडा (५१.०४).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com