Agriculture Wells : साडेपाच हजार विहिरींना मान्यता; अडीच हजार कामे सुरू

Well Scheme Update : अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेंतर्गत पाच हजार ५७३ विहिरींच्या कामांनना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
Agriculture Well
Agriculture WellAgrowon

Solapur News : अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेंतर्गत पाच हजार ५७३ विहिरींच्या कामांनना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मात्र, त्यापैकी ५० टक्के म्हणजेच दोन हजार ४४७ कामेच सुरू आहेत.

दीड एकर ते पाच एकर क्षेत्र असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना राबविण्यात येते. या योजनेतून शेतकऱ्याला विहीर खोदण्यासाठी चार लाखांचे अनुदान दिले जाते. या योजनेतून ६० टक्के कामे मजुरांमार्फत तर ४० टक्के कामे यंत्राद्वारे करण्याचे बंधन आहे.

Agriculture Well
Well Approval : पाणीटंचाई निवारण्यासाठी ६१ विंधन विहिरींना मंजुरी

ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याची आहे. त्यामुळे राज्य सरकारने या योजनेसाठी असलेली दोन विहिरींमधील १५० फुट अंतराची अटही रद्द केली आहे. जिल्ह्यातील सात हजार १३० शेतकऱ्यांनी विहिरीची मागणी केली होती. त्यापैकी सहा हजार ८८५ शेतकऱ्यांनी प्रस्ताव दिला होता.

Agriculture Well
Acquisition of Well : यवतमाळ जिल्ह्यात सात खासगी विहिरींचे अधिग्रहण

त्यातील पाच हजार ५७३ विहिरींच्या कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मात्र, त्यातील दोन हजार ४४७ विहिरींचेच काम सुरू आहे. यात सर्वाधिक ६१० माढा तालुक्यातील तर त्या खालोखाल ५२३ बार्शी तालुक्यातील विहिरींची संख्या आहे. दरम्यान शेतकऱ्याकडून मात्र, विहिरींची मागणी होत असून प्रस्ताव तत्काळ मंजुरीची गरज आहे.

काम सुरू असलेल्या विहिरींची तालुकानिहाय संख्या

तालुका विहिरी

अक्कलकोट २१८

बार्शी ५२३

करमाळा ९१

माढा ६१०

माळशिरस २०८

मंगळवेढा १२९

मोहोळ ७३

पंढरपूर ३०७

सांगोला १०६

दक्षिण सोलापूर ११३

उत्तर सोलापूर ६९

एकूण २४४७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com