Seed Treatment Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Germination : बीज प्रक्रियेतून उगवण क्षमतेमध्ये वाढ

Seed Treatment : यंदा ऐन मेमध्ये वळीव बरसला. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी प्रक्रियेला सुरुवात केली; मात्र शेतकऱ्यांनी सुरुवातीला १०० दाणे बीजप्रक्रिया केल्यास त्यावरून उगवण क्षमतेचा अंदाज बांधणे सोपे होऊन पीक उत्पादनात भर पडेल, असे जव्हार तालुका कृषी अधिकारी जयराम अढळ यांनी सांगितले.

Team Agrowon

Palghar News : तालुक्यात पारंपरिकसोबतच आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. यात कृषी संशोधन कृषी विभाग, सामाजिक संस्था आणि शेतकऱ्यांचे अनुभव लाभदायक ठरतात. यंदा ऐन मेमध्ये वळीव बरसला.

त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी प्रक्रियेला सुरुवात केली; मात्र शेतकऱ्यांनी सुरुवातीला १०० दाणे बीजप्रक्रिया केल्यास त्यावरून उगवण क्षमतेचा अंदाज बांधणे सोपे होऊन पीक उत्पादनात भर पडेल, असे जव्हार तालुका कृषी अधिकारी जयराम अढळ यांनी सांगितले.

उपलब्ध बियाण्यांच्या साठ्यातून १०० दाणे निवडून त्याची उगम चाचणी करावी. त्यासाठी मातीचा ट्रे, गोणपाट किंवा टिश्यू पेपर वापरता येतो. पाच ते सात दिवसांत किती दाण्यांतून कोंब फुटले, यावरून उगवण क्षमता समजते. किमान ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त उगम दिसल्यास ते बियाणे वापरण्यायोग्य ठरते.

बियाण्यांवर योग्य प्रक्रिया न केल्यास उगम दर कमी होतो आणि उत्पादनात मोठी घट होते, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करून घेणे गरजेचे आहे. आता पेरणीचा हंगाम उंबरठ्यावर आहे. शेतकऱ्यांनी आता योग्य बियाण्यांची निवड आणि त्यावर बीजप्रक्रिया करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. योग्य बीजप्रक्रिया आणि उगवण क्षमतेची खात्री झाल्यास पेरणीनंतरचा नुकसानीचा धोका टळतो. दर्जेदार उत्पादनाची शक्यता वाढते.

रोगापासून संरक्षण

बीजप्रक्रिया केल्यामुळे बियाण्यांपासून प्रसारित होणाऱ्या आणि जमिनीत असणाऱ्या बुरशीजन्य रोगापासून संरक्षण मिळते. जमिनीत असणाऱ्या किडींचा, तसेच पेरणीपासून ३०-३५ दिवस रसशोषक किडी आणि खोड माशी यांचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते. कीड व रोग व्यवस्थापनेच्या खर्चात बचत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Talathi Recruitment 2026: तलाठी भरतीत कोतवालांना प्राधान्य, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत

Native Seed Conservation: देशी वाणांच्या थेट विक्रीतून उभारले अर्थकारण

El Nino Impact: जागतिक शेतीमाल बाजाराला दुहेरी झटका

Fertilizer Black Marketing : खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात १.६९ लाख धाडी; महाराष्ट्रात सर्वाधिक कारवाई, लोकसभेत सरकारची माहिती

Gen Z Student Protest: ‘जेन झी’ आंदोलनाच्या निमित्ताने...

SCROLL FOR NEXT