Soybean Seed Treatment : सोयाबीनवरील किड, रोग टाळण्यासाठी या बीजप्रक्रिया करा

Soybean Sowing : पेरणीपुर्वी जर बियाण्यावर योग्य त्या बीजप्रक्रिया केल्या तर सोयाबीनवरील योणाऱ्या किड रोगाचा प्रादुर्भाव टाळता येईल.
Seed Treatment
Seed TreatmentAgrowon
Published on
Updated on

Kharif Season 2024 : खरीप हंगामात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी होत असली तरी कीड, रोगामुळे दरवर्षी सोयाबीन उत्पादनात मोठी घट होताना दिसते. हवामान बदल जसा  किड, रोगाला कारणीभूत ठरतो. याशिवाय बीज प्रक्रिया न केल्यामुळेही सोयाबीनवर किड, रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय. हे लक्षात घेऊन पेरणीपुर्वी जर बियाण्यावर योग्य त्या बीजप्रक्रिया केल्या तर सोयाबीनवरील योणाऱ्या किड रोगाचा प्रादुर्भाव टाळता येईल.

मागील ५ ते ६ वर्षांपासून महाराष्ट्रातील सोयाबीन पिकावर प्रामुख्याने पिवळा मोझॅक विषाणू, कळी करपा किंवा इंडियन बड ब्लाइट या विषाणूजन्य रोगाचा आणि खोडमाशी, मावा, पांढरी माशी, फुलकिडे या किडींचा प्रादुर्भाव होत आहे. काही ठिकाणी त्यांचा उद्रेकही होतो. खरं तर पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया केल्यास या कीड-रोगांना बऱ्यापैकी अटकाव करण शक्य आहे. बीज प्रक्रिया ही सोपा आणि परिणामकारक उपाय आहे.

बीजप्रक्रिया केल्यामुळे पिकावरील मर, मूळकुजसाठी कारणीभूत रोगकारक बुरशी जमिनीतच असतात. अनुकूल वातावरण मिळताच या बुरशीची वाढ होऊन रोपाच्या सुरुवातीच्या अवस्थेत रोगांचा प्रादुर्भाव होतो. बीजप्रक्रिया जर केली तर खोडामाशीसह मूळकुज, मर, कॉलर रॉट, हिरवा आणि पिवळा मोझॅक आणि कळी करपा या रोगापासून सरासरी ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत सोयाबीन पिकाच संरक्षण होत. कीटकनाशकाच्या बीजप्रक्रियेमुळे रसशोषक किडी, खोडमाशी आणि इतर किडींपासून पीक किमान एक महिन्यापर्यंत सुरक्षित राहत. जिवाणू संवर्धन खताची बीजप्रक्रिया केल्यामुळे पिकाला नत्राची उपलब्धता वाढून उत्पादनात १० ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ होते. जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता वाढते याशिवाय रासायनिक खताची बचतही होते. हे झाले बीजप्रक्रियेचे फायदे आता पाहुया सोयाबीनवर कोणती आणि किती प्रमाणात बिजप्रक्रिया करायची ते...

Seed Treatment
Seed Treatment : रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोणती बीजप्रक्रिया करावी?

पेरणीपूर्वी सोयाबीनवर बुरशीनाशक, कीडनाशक आणि जिवाणू संवर्धन खतांची बीजप्रक्रिया करण आवश्यक आहे. ही बीजप्रक्रिया आपल्याला पहिल्यांदा रासायनिक बुरशीनाशक, नंतर कीटकनाशकाची प्रक्रिया आणि सर्वांत शेवटी जैविक खत संवर्धकाची बीजप्रक्रिया या क्रमाणे करायची आहे. रासायनिक घटकांची प्रक्रिया पेरणीपूर्वी सोयीनुसार ८ ते १० दिवस आधी करून ठेवावी. त्यानंतर पेरणीच्या दिवशी पेरणीपूर्वी साधारणपने २ तास आधी जैविक खत संवर्धकाची प्रक्रिया करावी.

बीजप्रक्रिया करताना

कार्बोक्झिन ३७.५ टक्के अधिक थायरम ३७.५ टक्के हे संयुक्त बुरशीनाशक ३ ग्रॅम अधिक थायामेथोक्झाम ३० टक्के एफएस १० मि.लि. प्रति किलो बियाणे याप्रमाणात चोळावे.  

हे रासायनिक बुरशीनाशक वापरले नसल्यास पेरणी दिवशी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे प्रक्रिया करावी. यासोबत ब्राडीरायझोबिअम जापोनिकम २५ ग्रॅम अधिक पीएसबी २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे प्रमाणे या जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.

अशा प्रकारे बीजप्रक्रिया केल्यास सोयाबीनवर येणाऱ्या किड, रोगाला रोखता येतं. 

माहिती आणि संशोधन - राजीव घावडे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com