Seaweed Agrowon
ॲग्रो विशेष

Seaweed: पीक पोषणासाठी समुद्री शेवाळ अर्क

Crop Nutrition: समुद्री शेवाळाचा अर्क वेगवेगळ्या माध्यमातून खत म्हणून वापरला जातो. समुद्री शेवाळ नैसर्गिक रेणूंचा एक चांगला स्रोत मानला जातो. याच्या अर्कात पिकांच्या वाढीसाठी लागणारे आवश्यक मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात.

Team Agrowon

डॉ. मोनिका बर्गे, डॉ. दत्तात्रय मुरूमकर

Eco Friendly Farming: समुद्री शेवाळाचा अर्क वेगवेगळ्या माध्यमातून खत म्हणून वापरला जातो. समुद्री शेवाळ नैसर्गिक रेणूंचा एक चांगला स्रोत मानला जातो. याच्या अर्कात पिकांच्या वाढीसाठी लागणारे आवश्यक मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात.

सागरातील परिसंस्थेत आढळणाऱ्या विविध प्रकारच्या प्रकाशसंश्‍लेषक शेवाळास ‘सी-वीड’ या नावाने ओळखले जाते. हे शेवाळ जलीय परिसंस्थेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. किनारपट्टीच्या प्रदेशांमध्ये सागरी परिसंस्थेचा हा एक अत्यावश्यक भाग आहे. या शेवाळाचा अर्क काढला जातो. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, जे पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी खूप फायदेशीर आहेत.

समुद्री शेवाळाचे नऊ हजार प्रजाती आहेत. या प्रजाती मुख्यतः तीन गटांमध्ये वर्गीकृत आहेत. यामध्ये प्रकाशसंश्‍लेषक रंगद्रव्य, साठवण अन्न उत्पादन आणि सेल भिंत रचना घटक याचा समावेश होतो. अल्जिनिक अॅसिड आणि कॅरेजिनन सारखे फायकोकोलॉइड्स हे प्रामुख्याने तपकिरी आणि लाल शेवाळ पेशी भिंतींचे घटक आहेत. सूक्ष्म शेवाळ हे सागरी संसाधनांमध्ये आढळणाऱ्या काही अत्यंत जैविकदृष्ट्या सक्रिय संयुगांचे वास्तविक उत्पादक मानले जातात.

जगभरात व्यावसायिक विकासासाठी सुमारे २२१ सागरी शेवाळ प्रजाती (रोडोफाइट्स १२५, फायओफाइट्स ६४ आणि क्लोरोफाइट्स ३२) वापरल्या जातात. १४५ प्रजातींपैकी २४ प्रजातींचा वापर अन्न म्हणून केला जातो. २४ प्रजाती या पारंपरिक औषधे तयार करण्यासाठी आणि २५ प्रजाती कृषी आणि पशुखाद्यांसाठी वापरल्या जातात.

सागरी शेवाळाच्या एकूण ८०० जाती आढळतात. त्यांपैकी ६० जाती औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. मुंबई, कारवार, रत्नागिरी, गोवा, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक, गुजरात राज्यातील किनारी भागात आगर आणि आल्जिनेट निर्मिती उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत.

समुद्री शेवाळाचा अर्क वेगवेगळ्या माध्यमातून खत म्हणून वापरला जातो. समुद्री शेवाळ नैसर्गिक रेणूंचा एक चांगला स्रोत मानला जातो. याच्या अर्कात पिकांच्या वाढीसाठी लागणारे आवश्यक मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. तसेच ऑक्झिन्स, जिबरेलिन्स, अँन्टीबायोटीक्स हे सर्व पिकांना आवश्यक असणारे घटक समाविष्ट आहेत.

पेप्टाइड्स, पॉलिसेकेराइड्स आणि ऑलिगो, लिपिड्स आणि प्रोटिन्स सारख्या विविध प्रकारचे रेणू असतात. अनेक प्रकारची जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात. यामध्ये सत्तरहून अधिक खनिजे, जीवनसत्त्वे आणि एन्झाइम्स असतात, जे पिकांच्या वाढीसाठी तसेच माती सुपीक बनविण्यासाठी फायदेशीर असतात.

नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम, लोह, झिंक, बोरॉन, कॅल्शिअम, आयोडीन, मॉलिब्डेनम आणि ऑक्झिन्स, जिबरेलीन, प्रतिजैविक, अन्नद्रव्ये, जीवनसत्वे, ह्युमिक ॲसिड, अल्जिनेट उपलब्ध आहे.

एस्कोफाइलम नोडोसम हे मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे समुद्री शेवाळ आहे. या शेवाळाच्या अर्कामुळे वनस्पतीमध्ये अन्नद्रव्य शोषण सुधारते, ज्यामुळे पिकाची सर्वांगीण वाढ होते.आळवणी केल्यास पांढऱ्या मुळ्यांची वाढ होते. सुपीकता वाढून सूक्ष्म जिवांची संख्या वाढण्यास मदत होते. एकसमान फळांचा आकार आणि वजन मिळण्यास मदत होते. पिकाची प्रकाशसंश्‍लेषण क्रिया वाढवते. गुणवत्ता सुधारते, उत्पादन वाढते. पर्यावरणीयदृष्ट्या सुरक्षित आहे.

- डॉ. मोनिका बर्गे ७३९७८१७३९४

(सहायक प्राध्यापिका, वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, कराड)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme: नव्या विहीरींसाठी राज्य सरकारकडून मिळणार ४ लाख अनुदान; शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची योजना

Agrowon Podcast: टोमॅटोच्या दरात तेजी; हिरवी मिरची टिकून, केळीला उठाव, कोथिंबीर नरमली तर तुरीचा बाजार दबावातच

Nashik Industrial Hub : उद्योजकांनी पर्यावरणपूरक,प्रदूषणमुक्त उद्योगांना प्राधान्य द्यावे

Lumpy Skin Disease : ‘माझा गोठा, स्वच्छ गोठा’ मोहिमेसाठी समिती नियुक्त

Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा; ओबीसी आरक्षणासह, नव्या प्रभागरचनेला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी

SCROLL FOR NEXT