Agriculture Scheme: नव्या विहीरींसाठी राज्य सरकारकडून मिळणार ४ लाख अनुदान; शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची योजना

Well Irrigation Subsidy Scheme: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी ४ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळते. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या शेतीला पाण्याचा स्थिर स्रोत मिळून उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.
Agriculture Well
Agriculture WellAgrowon
Published on
Updated on

थोडक्यात माहिती...

  • अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना विहीर बांधणीसाठी ४ लाखांपर्यंत अनुदान मिळते.

  • योजना ०.४० हेक्टर ते ६ हेक्टर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लागू आहे (BPL शेतकऱ्यांना ६ हेक्टर मर्यादा नाही).

  • अर्जासाठी ७/१२, ८अ उतारा, जात प्रमाणपत्र, आधार, बँक तपशील आवश्यक.

  • अर्ज mahadbt.maharashtra.gov.in पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने करावा लागतो.

  • योजना “पहिल्यांदा अर्ज करणाऱ्याला प्रथम प्राधान्य” या तत्वावर कार्यान्वित आहे.

Pune News: राज्यातील अनेक भागांमध्ये सिंचन सुविधा नसल्यामुळे शेती अजूनही पावसावर अवलंबून आहे. या पावसाअभावी शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट आणि आर्थिक नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी ४ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळते. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या शेतीला पाण्याचा स्थिर स्रोत मिळून उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.

Agriculture Well
Agriculture Scheme: ट्रॅक्टरसाठी शेतकऱ्यांना १.५ लाख रुपयांपर्यंत अनुदान; लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची योजना

या योजनेत ०.४० हेक्टर ते ६ हेक्टरपर्यंत शेती असलेल्या अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी अनुदान मिळणार आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता वाढून उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. ही योजना केवळ सिंचन पुरवठा वाढवण्यासाठी नाही, तर शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने सरकारचे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

Agriculture Well
Agricultural Scheme: शेतकऱ्यांनो, ट्रॅक्टरसह कृषी अवजारांसाठी सरकारकडून ५० टक्क्यांपर्यंत अनुदान

योजनेसाठी पात्रतेचे निकष

  • अर्जदार शेतकरी अनुसूचित जाती / नवबौद्ध प्रवर्गातील असावा.

  • शेतकऱ्याच्या नावावर ७/१२ आणि ८अ उतारा असावा (शहरी भाग वगळता).

  • जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक खाते आवश्यक.

  • बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे.

  • दारिद्र्यरेषेखालील (BPL) शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.

  • BPL शेतकऱ्यांना ६ हेक्टर मर्यादा लागू नाही.

  • इतर शेतकऱ्यांकडे ०.४० ते ६ हेक्टर दरम्यान शेती असणे आवश्यक.

  • दुर्गम भागातील शेतकऱ्यांकडे ०.४० हेक्टरपेक्षा कमी जमीन असल्यास, एकत्र अर्ज केल्यास पात्रता मिळते.

  • एकदा अनुदान घेतल्यास, पुढील ५ वर्षे पुन्हा लाभ मिळणार नाही.

  • जुनी विहीर असल्यास, २० वर्षांनंतरच दुरुस्तीचे अनुदान मिळेल.

  • पूर्वी योजनेसारख्या अन्य योजनेचा लाभ घेतल्यास, या योजनेसाठी पात्र ठरणार नाही.

  • अर्ज करण्यासाठी शेतकरी ओळख प्रमाणपत्र (Farmer ID) आवश्यक आहे.

  • महाडीबीटी पोर्टलवरील अर्जासाठी राज्य सरकारने “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” ही अट लागू केली आहे.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  • महाडीबीटी पोर्टल वर जावे.

  • नवीन नोंदणी करा किंवा आधीचे खाते असेल तर Login करा.

  • "कृषी विभाग" निवडा.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या योजनेवर क्लिक करा.

अर्जात खालील माहिती भरा

  • नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक

  • शेतजमीन तपशील (गट नंबर, क्षेत्रफळ)

  • बँक तपशील (IFSC, खाते क्रमांक इ.)

कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा

  • ७/१२ व ८अ उतारा

  • आधार कार्ड

  • शेतकरी ओळख प्रमाणपत्र (Farmer ID)

  • बँक पासबुक झेरॉक्स

  • शेतजमिनीचा नकाशा (गरज असल्यास)

  • पासपोर्ट साईझ फोटो

  • संयुक्त करारपत्र (जर जमीन ०.४० हेक्टरपेक्षा कमी असेल आणि एकत्र अर्ज करत असतील तर)

  • स्वयंघोषणा पत्र (याआधी कोणत्याही अशा योजनेचा लाभ घेतलेला नाही यासाठी)

अर्ज सबमिट करा

  • पावती डाउनलोड करा आणि सुरक्षित ठेवा.

  • अर्जाची छाननी व मंजुरी कृषी विभागाकडून होईल.

अधिकच्या माहितीसाठी संपर्क

  • गावातील कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करा.

  • पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कृषी विभागाशी थेट संपर्क साधा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

१. या योजनेत कोण पात्र आहेत?
अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध वर्गातील शेतकरी पात्र आहेत.

२. या योजनेत किती अनुदान मिळते?
विहीर बांधणीसाठी ४ लाखांपर्यंतचे अनुदान मिळते.

३. BPL शेतकऱ्यांना कोणती सवलत आहे?
६ हेक्टर मर्यादा लागू नसून त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते.

४. ऑनलाइन अर्ज कसा करावा?
महाडीबीटी पोर्टलवर जाऊन ‘कृषी विभाग’ निवडून संपूर्ण माहिती भरावी लागते.

५. योजनेसाठी कोणते कागदपत्रे लागतात?
७/१२,, ८अ, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, Farmer ID, बँक पासबुक इत्यादी आवश्यक आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com