Nashik Industrial Hub : उद्योजकांनी पर्यावरणपूरक,प्रदूषणमुक्त उद्योगांना प्राधान्य द्यावे

Nashik Development : नाशिकमध्ये सुरू असलेले नवनवीन प्रकल्प व उद्योगांच्या माध्यमातून नाशिक ‘औद्यगिक हब’ म्हणून नावारूपास येत आहे.
Pankaja Munde
Pankaja MundeAgrowon
Published on
Updated on

Nahsik News : नाशिकमध्ये सुरू असलेले नवनवीन प्रकल्प व उद्योगांच्या माध्यमातून नाशिक ‘औद्यगिक हब’ म्हणून नावारूपास येत आहे. त्याअनुषंगाने उद्योजकांनी पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त उद्योगांना प्राधान्य देण्यात यावे, असे आवाहन राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) आणि अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (एआयएमए) यांच्या प्रतिनिधीसोबत पर्यावरण व वातारणीय बदल व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

Pankaja Munde
Textile Industry: येवल्यातील पैठणी उद्योगाला मिळणार अधिक चालना

या वेळी आमदार सीमा हिरे,आमदार देवयानी फरांदे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे, उपसचिव तांत्रिक डॉ. राजेंद्र राजपूत, प्रादेशिक अधिकारी लिंबाजी भड, ‘निमा’चे अध्यक्ष आशिष नहार, ‘आयमा’चे अध्यक्ष ललित बूब, उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, जळगाव उपप्रादेशिक अधिकारी करणसिंग राजपूत, धुळे उप प्रादेशिक अधिकारी प्रणव पाखले, अहिल्यानगर उपप्रादेशिक अधिकारी चंद्रकांत शिंदे वैज्ञानिक अधिकारी सुरेश माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व उद्योजक उपस्थित होते.

Pankaja Munde
Maharashtra’s Grape Industry: जागतिक ‘व्हिजन’ ठेवून द्राक्ष उद्योगाची वाटचाल

मुंडे म्हणाल्या, की नवनवीन उद्योग व उद्योजकांना बळ देण्यासाठी व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तसेच उद्योजक व कंपन्या आस्थापनांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन करावे.

प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही, याची काळजी घ्यावी. सिंहस्थाच्या माध्यमातून नाशिकमध्ये शाश्‍वत कामे होत आहेत. तसेच उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी उद्योग विभागाकडून आवश्यक निधी मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com