Tomato Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Tomato Fungal Disease : टोमॅटो पिकातील ‘स्क्लेरोशिया मर रोग’

Tomato Disease Control : टॉमॅटो पिकामध्ये मुख्यत: साऊथर्ण मर रोग, फुझॅरियम मर, लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा आणि जिवाणूजन्य करपा या महत्त्वाचे रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.

Team Agrowon

राहुल वडघुले

टॉमॅटो पिकामध्ये मुख्यत: साऊथर्ण मर रोग, फुझॅरियम मर, लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा आणि जिवाणूजन्य करपा या महत्त्वाचे रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. या बरोबरच सध्या जिवाणूजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याच भागांत दिसून येत आहे.

आजच्या लेखात टोमॅटो पिकातील स्क्लेरोशिया मर रोग या रोगाची माहिती घेऊ. या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः खोडावर, फळांवर आणि फांद्यांवर दिसून येतो. प्रादुर्भावामुळे पाने, फांद्या सुकतात. त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान होते.

रोगाची माहिती

रोगाचे नाव : स्क्लेरोशिया मर रोग

रोग निर्माण करणाऱ्या बुरशीचे शास्त्रीय नाव ः १) जुने नाव ः स्क्लेरोशियम रोलफ्सी (sclerotium rolfsii), २) नवीन नाव : ॲग्रोअथेलिया रोलफ्सी (Agroathelia rolfsii)

हा रोग बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो.

बुरशीची डिव्हिजन ः Basidiomycota

परजीवी प्रकार ः Necrotrophic Parasite

नुकसान ः या रोगामुळे पिकाचे ५ ते ६० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.

यजमान पिके ः भाजीपाला, फळपिके, फुले, तेलधान्यवर्गीय पिकांवर येतो. उदा. मिरची, टरबूज, खरबूज, सोयाबीन, बीट, भेंडी इत्यादी.

रोग कसा निर्माण होतो

या रोगाचा प्रसार हा स्क्लेरोशिया व बुरशीच्या तंतूपासून होतो. हे दोन्ही जमिनीत आणि आधीच्या पीक अवशेषांवर अनेक वर्षे जिवंत राहतात. साधारण २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान व ९० टक्के आर्द्रता, ओलसर जमीन या रोगास अनुकूल असते. अशा वातावरणात रोगकारक बिजाणू व तंतूपासून रोगाची लागण होते. त्यानंतर ३ ते ५ दिवसांत खोडावर लक्षणे दिसून येतात.

रोगाचा प्रसार

बुरशीचे तंतू आणि स्क्लेरोशिया असलेली माती एका ठिकाणाहून दुसरीकडे गेली, किंवा वाहते पाणी, जोराचे वारे, शेती अवजारे यांना रोगाचे तंतू आणि स्क्लेरोशिया चिटकून दुसरीकडे गेल्यानंतर रोगाचा प्रसार होतो.

नियंत्रणाचे उपाय

  • पीक फेरपालट करावी.

  • आधीचे पीक या रोगास बळी पडणारे नसावे.

  • लागवडीपूर्वी बीजप्रक्रिया अवश्य करावी.

  • जास्त पाऊस असताना लागवड करणे टाळावे.

  • जमिनीचा सामू ॲसिडीक नसावा.

  • रोगग्रस्त झाडे काढून जाळून त्वरीत नष्ट करावीत.

  • जमिनीवर ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी तसेच आळवणी करावी.

  • नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या बुरशीनाशकांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करावा.

शिफारस केलेली बुरशीनाशके

(लेबल क्लेमयुक्त)

  • कॅप्टन (७५ डब्ल्यूएस)

  • मेटॅलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब (३१.८ टक्के ईएस)

  • थायोफेनेट मिथिल (७० टक्के डब्ल्यूपी)

लक्षणे

  • रोगाची लक्षणे प्रामुख्याने खोडावर दिसतात. खोडावर जमिनीलगत काळसर ते तपकिरी डाग दिसून येतात. तो भाग आतमध्ये गेल्याप्रमाणे दिसतो. त्या भागावर पांढरट रंगाच्या बुरशीची वाढ दिसू लागते.

  • बहुतांश वेळा प्रादुर्भावामुळे खोडाला मुळे फुटलेली दिसतात. त्यावर पांढरट वाढ दिसून येते.

  • या बुरशीच्या वाढीवर गोलाकार मण्यांसारखी वाढ दिसून लागते. यालाच स्क्लेरोशिया (sclerotia) असे म्हणतात. हे स्क्लेरोशिया सुरुवातीला पांढरे व नंतर काळपट तपकिरी होतात.

  • या रोगामुळे झाडाची पाने सुकू लागतात. झाड लवकर वाळून जाते. त्यानंतर अशीच लक्षणे फळांवर देखील दिसतात. आणि फळे गळून जातात.

रोग निश्‍चिती कशी होते?

रोगाचे स्क्लेरोशिया पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज पडत नाही. उघड्या डोळ्यांनी आपण पांढरे किंवा तपकिरी स्क्लेरोशिया पाहू शकतो. पांढऱ्या बुरशीच्या आवरणावर हे स्क्लेरोशिया लहान मणी पडल्याप्रमाणे दिसतात, किंवा मोहरीच्या दाण्याने प्रमाणे दिसतात.

कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत. फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे. खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे. बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे. लेबल क्लेम वाचावेत. पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत. रसायनांचा गट तपासावा. पीएचआय, एमआरएल तपासावेत. पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT