Tomato Disease : टोमॅटोवरील अमेरिकन लीफ मायनर

American Leaf Miner : अलीकडे एक नवीन प्रकारची नागअळी टोमॅटो पिकावर दिसून येत आहे. या किडीचे नाव ‘अमेरिकन टोमॅटो पिन बोरर’ किंवा ‘अमेरिकन टोमॅटो लीफ मायनर’ असे आहे. या किडीचा प्रसार पेरू या देशातून झाला आहे.
American Leaf Miner
American Leaf Miner Agrowon

राहुल वडघुले

Tomato Crop Disease : महाराष्ट्रामध्ये टोमॅटो हे अत्यंत महत्त्वाचे पीक म्हणून घेतले जाते. प्रामुख्याने नाशिक, नगर, पुणे या जिल्ह्यांत टोमॅटो लागवड सर्वाधिक असते. टोमॅटो पिकामध्ये मुख्यत: पांढरी माशी, फळ पोखरणारी अळी, नागअळी या महत्त्वाच्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अलीकडे एक नवीन प्रकारची नागअळी टोमॅटो पिकावर दिसून येत आहे. या किडीचे नाव ‘अमेरिकन टोमॅटो पिन बोरर’ किंवा ‘अमेरिकन टोमॅटो लीफ मायनर’ असे आहे. या किडीचा प्रसार पेरू या देशातून झाला आहे.

आपल्याकडे सर्वप्रथम ऑक्टोबर २०१४ मध्ये या किडीचा प्रादुर्भाव पुणे भागात दिसून आला होता. त्यानंतर इतर टोमॅटो उत्पादक जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे.

नमुना मिळण्याचे ठिकाण

सदर किडीचा नमुना आम्हाला अहमदपूर, जि. लातूर येथून २०२२ मध्ये पहिल्यांदा मिळाला होता.

किडीची माहिती

किडीचे नाव : अमेरिकन लीफ मायनर (leaf Miner)

शास्त्रीय नाव : Tuta absolata

किडीच्या अवस्था ः प्रौढ (पतंग), अंडी, अळी, कोष.

नुकसान करणारी अवस्था : अळी

नुकसान : या किडीची अळी प्रामुख्याने पाने, खोड आणि फळे यांचे नुकसान करते. किडीमुळे ५० ते १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होते.

यजमान पिके : बटाटा, वांगी, ढोबळी मिरची, तंबाखू इ.

American Leaf Miner
Tomato Disease : टोमॅटो पिकातील ‘ॲन्थ्रॅकनोज’

लक्षणे

किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत दिसून येतात. म्हणजेच रोप अवस्थेपासून ते फळ काढणीपर्यंत दिसून येतात. अगदी १५ ते २० दिवसांत लक्षणे दिसू लागतात.

सुरुवातीला नवीन पाने कुरतडलेली दिसून येतात किंवा पानांना छिद्रे पडलेली दिसतात. या पानांवर अळीची काळ्या रंगाची विष्टा प्रकर्षाने दिसून येते.

अळी पानामध्ये पोखरते व माइन तयार करते. याआधी टोमॅटो पिकामध्ये प्रादुर्भाव दिसून येणाऱ्या नागअळीच्या तुलनेत या अळीने तयार केलेले माइन हे आकाराने मोठे असतात. या माइनच्या सुरवातीला अळीची काळी विष्ठा जमा झालेली दिसते.

फळे लागल्यानंतर अळी फळांत प्रवेश करून फळ खराब करते. प्रादुर्भावग्रस्त फळावर ४ ते ५ छिद्रे दिसून येतात. अळीची आत जाण्याची आणि बाहेर येण्याची अशी दोन्ही छिद्रे आकाराने लहान असतात. म्हणूनच त्याला ‘पिन वर्म’ असे म्हणतात.

American Leaf Miner
Tomato Varieties : खरीप हंगामासाठी टोमॅटोचे सुधारित वाण

किडीचा जीवनक्रम

अमेरिकन लीफ मायनर या किडीच्या प्रौढ (पतंग), अंडी, अळी आणि कोष अशा एकूण चार अवस्था असतात. याला संपूर्ण रूपबदल (complete Metamorphosis) असे म्हणतात.

प्रौढ अवस्था

प्रौढ पतंग ६ ते ७ मि.मी. असून राखाडी- तपकिरी रंगाचा असतो. पतंगाच्या पुढील पंखांवर काळे ठिपके, तर मागचे पंख राखाडी रंगाचे असतात. त्याचे ॲन्टेना व पाय लांब असतात. त्यावर काळे आणि तपकिरी रंगाचे पट्टे असतात.

अंडी अवस्था

मादी पतंग एका ठिकाणी एक अशी २०० अंडी घालते. अंडी पानाच्या मागच्या बाजूला, फळावर, फांद्यांवर किंवा फुलांच्या देठावर घातली जातात. अंडी सुरवातीला पांढरी नंतर पिवळसर व शेवटी काळसर रंगाची अत्यंत छोटी अशी असतात. अंडी अवस्था ३ ते ५ दिवस असते.

अळी अवस्था

अंड्यातून निघालेली अळी फिक्कट पिवळ्या रंगाची असते. नंतर गुलाबी आणि नंतर हिरव्या रंगाची असते. अळी अवस्था १५ ते ३० दिवसांची असते. यामध्ये ती वाढीच्या ४ अवस्थांतून जाते.

कोष अवस्था

कोष ही पिवळसर तपकिरी रंगाची हालचाल न करणारी अवस्था असते. कोष ६ मिमी असतो. ही अवस्था १० ते १५ दिवसांची असते. कोष अवस्था शक्यतो जमिनीवर किंवा काही वेळा पाने किंवा फळावर असते.

नुकसानीचा प्रकार

अंड्यातून निघालेली अळी ७० मिनिटांमध्ये पानाच्या आतमध्ये घुसून आतील अन्नद्रव्ये खाण्यास सुरुवात करते. त्यामुळे पाने खराब होऊन वाळून जातात.

अळी नवीन रोपांची पाने कुरतडते. त्यामुळे पानांना छिद्रे पडतात.

फळाला २ ते ५ छिद्रे पाडून अळी आतमध्ये जाऊन फळ खराब करते. अशा फळांना बाजारात चांगले दर मिळत नाहीत.

नुकसानीचा कालावधी

जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत नुकसान होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com