Team Agrowon
सध्या बऱ्याच ठिकाणी टोमॅटो पिकार जिवाणूजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
हा रोग प्रामुख्याने शेंड्याकडे दिसून येतो. रोगाच्या प्रादुर्भावामुळे पाने, फांद्या सुकतात. टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते.
एक ते दोन दिवसांत संपूर्ण झाड सुकलेले व पिवळे दिसते. कालांतराने झाड मरून जाते.
झाडाच्या खालच्या बाजूला तपकिरी रंगांचे अनेक उंचवटे दिसतात. झाडाला जमिनीजवळ वरच्या बाजूला अनेक मुळे फुटलेली दिसतात.
जमिनीमधील मुळे सडलेली दिसतात. खोड आतील भागामध्ये सडलेले तपकिरी रंगाचे दिसते.
जवळपास २०० हून अधिक वनस्पतीवर हा रोग आढळून येतो. जसे की बटाटा, वांगी, मिरची, तंबाखू, झेंडू, सूर्यफूल, झेनिया इत्यादी.
हा रोग नियंत्रणात येणे अतिशय अवघड असते. त्यामुळे लागवडीसाठी रोग प्रतिकारक्षम जातींची निवड करणे अत्यंत आवश्यक असते.