Anil Ghanwat Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Procurement Scam: नाफेड-एनसीसीएफच्या कांदा खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा; संसदीय चौकशीची घनवटांची मागणी

Anil Ghanwat: नाफेड-एनसीसीएफमार्फत सुरू असलेल्या कांदा खरेदी प्रक्रियेमध्ये प्रचंड अपारदर्शकता आणि संभाव्य कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी या संदर्भात संसदीय चौकशीची मागणी केली आहे.

Roshan Talape

Pune News: केंद्र सरकारच्या मूल्य स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफकडून तीन लाख टन कांदा खरेदी सुरू आहे. मात्र ही खरेदी प्रक्रिया पारदर्शक नाही. कोणत्या एजन्सींना परवाने मिळाले, खरेदी केंद्र कुठे आहेत, आणि दर किती आहेत, याची कोणतीच माहिती उघड करण्यात आलेली नाही. कांदा खरेदीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे, असा गंभीर आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केला आहे.

घनवट म्हणाले की, ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नसून काही ठराविक व्यापारी, सहकारी संस्था आणि नाफेड-एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी राबवली जात आहे. कांदा खरेदीस यंदा उशीर झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजारात कमी दराने विकला.

सध्या बाजारात कांद्याचा दर सरासरी २० रुपये किलो आहे, पण सरकारने फक्त १४.३५ रुपये दराने खरेदी सुरू केली. आता दर १६ रुपये होण्याची शक्यता आहे, तरीही शेतकऱ्यांचा खर्चही निघणार नाही. वरून सरकारचा प्लान असा की, साठवलेला कांदा नंतर बाजारात आणून दर पाडायचा.

काही व्यापाऱ्यांनी याआधीच ८-१० रुपये किलो दराने कांदा खरेदी करून ठेवला आहे. तोच कांदा आता सरकारला १६ रुपये दराने विकला जातोय. म्हणजेच, व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा नफा, आणि शेतकऱ्यांना तोटाच. यासंबंधी यापूर्वीही पाच हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेत करण्यात आला आहे. गोवा मार्केटिंग फेडरेशनमधील एक अधिकारी निलंबित झाले आहेत, आणि इतर राज्यांतही कांदा पाठवताना असेच प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. पण त्याची चौकशीही टाळली जात आहे.

घनवट यांच्या मते, ही खरेदी शेतकऱ्यांना फायदा न होता काही एजन्सी, सहकारी संस्था, नाफेड व एनसीसीएफचे अधिकारी आणि राजकीय पुढारी यांना फायदा मिळवून देण्यासाठी केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर, अनिल घनवट यांनी केंद्र सरकारला ही खरेदी तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. तसेच या घोटाळ्याची संसदीय चौकशी व्हावी, आणि शेतकरी व ग्राहक यांची फसवणूक थांबावी, यासाठी स्वतंत्र भारत पक्ष या प्रक्रियेवर लक्ष ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Local Body Elections: कुठे 'ईव्हीएम'मध्ये बिघाड, कुठे बोगस मतदान, जादूटोण्याचा प्रकारही उघडकीस

Cooperative Issue: ‘त्या’ संस्थांच्या मालमत्ता लिलावासाठी विशेष न्यायालय

Crop Advisory: कृषी सल्ला (कोकण विभाग)

Sugarcane Price: उसाला तीन हजार ५५० रुपये भाव द्या

Solar Cold Storage: सौर ऊर्जा आधारित शीतगृह

SCROLL FOR NEXT