Micro Irrigation Scam : सूक्ष्मसिंचन घोटाळा : कमी वसुलीचे कारण दाखवून दोषींना अभय

Nanded Irrigation Scheme Fraud : नांदेडमधील मुखेड, कंधार, नायगाव व बिलोली तालुक्यांत बनावट दस्तावेज दाखवून तब्बल सहा कोटी रुपयांचे सूक्ष्मसिंचन संच बसविण्यात आल्याचे दाखविण्यात आले होते.
Micro Irrigation
Micro IrrigationAgrowon
Published on
Updated on

Nanded News : बहुचर्चित सूक्ष्मसिंचन संच गैरव्यवहार प्रकरणात चार कर्मचाऱ्यांची वसुली रक्कम कमी असल्याचे कारण देऊन त्यांची नावे एफआयआरमधून वगळण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातून आल्यामुळे फिर्यादी असलेले कृषी अधिकारी संदीप स्वामी यांनी नांदेड ग्रामीण ठाण्यात अर्ज दाखल केला आहे. गैरव्यवहार हा मोठ्या रकमेचा असतो, असे यातून स्पष्ट होत आहे.

नांदेडमधील मुखेड, कंधार, नायगाव व बिलोली तालुक्यांत बनावट दस्तावेज दाखवून तब्बल सहा कोटी रुपयांचे सूक्ष्मसिंचन संच बसविण्यात आल्याचे दाखविण्यात आले होते. हा प्रकार मागील २०२१-२०२२ व २०२२-२०२३ मध्ये झाला. या प्रकरणी अनेकांनी केलेल्या तक्रारी तसेच विधानसभेत तारांकित प्रश्‍न झाल्यामुळे राज्याच्या कृषी संचालकांनी लातूरच्या विभागीय कृषी सहसंचालकांना याबाबत चौकशीचे आदेश दिले होते.

Micro Irrigation
Micro-Irrigation Subsidy: सूक्ष्म सिंचन निधीत ११९ कोटींची कपात; शेतकऱ्यांसाठी मोठा फटका!

यानुसार अधीक्षक कृषी अधिकारी श्री. तीर्थंकर यांनी केलेल्या पाहणीत मुखेड, कंधार, बिलोली व नायगाव तालुक्यात संबंधित कृषी पर्यवेक्षकांनी वितरकांच्या मदतीने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना बगल देत बनावट दस्तावेज बनवून तब्बल सहा कोटींचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले.

या प्रकरणी एका मंडळ अधिकाऱ्यांसह १० कृषी पर्यवेक्षकांविरोधात नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात दोषी असलेल्यांकडून वसुली करण्यात येणारी रक्कमही निश्‍चित करण्यात आली होती.

या प्रकरणात कृषी विभागाकडून प्रशासकीय कारवाई करत दोषी विरुद्ध निलंबन करण्याचे काम मात्र करण्यात आले नाही. उलट यातील तीन कर्मचाऱ्यांकडे कमी वसुली असल्याचे कारण देत लातूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडून नांदेडच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला पत्र पाठवून तीन कर्मचाऱ्यांची नावे एफआयआरमधून वगळ्याचे कळविले आहे. यावरुन फिर्यादी असलेले कृषी अधिकारी संदीप स्वामी यांनी तिघांचे नावे वगळण्यात यावे असे पत्र नांदेड ग्रामीण पोलिसात दिले आहे. यावरुन गैरव्यवहार मोठा असला तरच त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करावी, असा संदेश कृषी विभागाने दिल्याचे स्पष्ट होत आहे.

Micro Irrigation
Micro Irrigation Scheme: सूक्ष्म सिंचनात गरज आमूलाग्र बदलाची

नावे वगळण्याचे पत्र दिलेले कर्मचारी

नायगाव तालुक्यातील कारला येथे एक सूक्ष्मसिंचन संचाचा प्रस्ताव अपात्र ठरल्याने तत्कालीन कृषी सहायक एच. पी. नव्हारे यांच्याकडून १९ हजार ३३५ रुपये वसुलीचे आदेश आहेत. यासोबतच सध्या सेवानिवृत्त झालेले एम. बी. बैस यांच्या कार्यकाळात बिलोली तालुक्यातील बोरगाव थडी व आळंदी येथील दोन प्रस्ताव अपात्र झाल्यामुळे त्यांच्याकडून ३७ हजार ४९९ रुपये वसुलीचे आदेश दिले आहेत.

तर नायगाव तालुक्यातील कृषी पर्यवेक्षक एच. पी. नव्हारे यांचा कारला येथील एक प्रस्ताव अपात्र ठरल्याने १९ हजार ३५५ रुपये वसुलीचे आदेश दिले आहेत. तर बिलोली तालुक्यातील कृषी पर्यवेक्षक आर. पी. जाधव यांचा वजियाबाद येथील एक प्रस्ताव अपात्र ठरल्याने त्यांच्याकडून १९ हजार ३५४ रुपये रक्कम वसुलीचे आदेश दिले आहेत.या चार कर्मचाऱ्यांचे नाव एफआयआरमधून वगळण्याचे पत्र कृषी विभागाने देवून गैरव्यवहाराला प्रोत्साहन दिल्याचीच चर्चा होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com