Agriculture Implements  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Implements Scheme : कृषी अवजारे पुरवठा योजनेत घोटाळा

Agriculture Mechanization Scheme : समाज कल्याण विभागामार्फत महिला बचत गटांना पुरवण्यात आलेल्या कृषी अवजारे संच पुरवठ्यात मोठा घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब समोर आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : समाज कल्याण विभागामार्फत महिला बचत गटांना पुरवण्यात आलेल्या कृषी अवजारे संच पुरवठ्यात मोठा घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब समोर आहे. या प्रकरणी समाज कल्याण विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

समाज कल्याण विभागामार्फत वर्ष २०२१-२२ मध्ये जिल्ह्यातील १०० महिला बचत गटांना कृषी अवजारे देण्याची योजना आखण्यात आली होती. यासाठी खनिज प्रतिष्ठानमधून ८ कोटी ७१ लाखांचा निधी मंजूर झाला. प्रत्येक महिला बचत गटाला ८ लाख ७१ हजारांचे साहित्य देण्यात येणार होते.

सर्व तालुक्यातील महिला बचत गटांची यासाठी निवड करण्यात आली. परंतु उमरेड तालुक्यातील महिला बचत गटांना साहित्य मिळालेच नाही. या बाबतची तक्रार महिला बचत गटाने विभागीय आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली. त्यांनी संबंधित तक्रार समाज कल्याण विभागाकडे वर्ग केली.

मिळालेल्या माहितीनुसार, साहित्य पुरवठा करण्याचे काम साई नामक कंपनीला देण्यात आले होते. हे साहित्य ९० टक्के अनुदानावर देण्यात आले. १० टक्के रक्कम भरल्यावर अनुदानाची रक्कम लाभार्थी बचत गटाच्या खात्यात टाकण्यात आली. परंतु ती लगेच काढण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

पुरवठादाराकडून काही साहित्य बचत गटांना देण्यात आले. परंतु ते नादुरुस्त असल्याचे कारण पुढे करीत परते नेले. तर काही साहित्य असून ते धूळ खात असल्याचे समजते. त्यामुळे बचत गटांना काहीच साहित्य मिळाले नाही. हा मोठा घोटाळा असून, यात अनेकांचा समावेश असल्याची चर्चा आहे.

या संदर्भातील तक्रार प्राप्त झाली आहे. मोका चौकशीही केली. प्रथमदर्शनी यात घोळ असल्याचे दिसत असल्याने याची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
- सुकेशिनी तेलगोटे, सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT