Agriculture Implements : रब्बी हंगामातील पिकांसाठी सुधारित अवजारे व यंत्रे

कृषी यांत्रिकीकरणामुळे नैसर्गिक स्रोतांची उत्पादन क्षमता वाढते. शेतीच्या विविध कामांशी संबंधित कष्ट कमी होतात. मजुरांची कमतरता भरून काढली जाते. रब्बी हंगामासाठी उपयुक्त यंत्रे व अवजारांची माहिती घेऊ.
Rabi Season
Rabi SeasonAgrowon

ट्रॅक्टरचलित फुले ऑटोमॅटिक पल्टी नांगर

• ४५ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालवता येते.

• ट्रॅक्टरच्या पोझिशन कन्ट्रोल लिव्हरने ऑटोमॅटिक पलटी करता येतो.

• या नांगरामध्ये पल्टी करण्याकरिता मेकॅनिकल लिव्हर, हायड्रोलिक सिलिंडरची आवश्यकता नाही.

• या नांगरांची प्रक्षेत्रीय कार्यक्षमता ८०.४५ टक्क्यांइतकी आहे.

• या नांगरासाठी हायड्रोलिक नांगरापेक्षा देखभाल व दुरुस्ती खर्च कमी येतो.

• या नांगराची किंमत हायड्रोलिक नांगराच्या किमतीपेक्षा जवळपास २० टक्क्यांनी स्वस्त पडते.

• या नांगराने जमिनीची नांगरणी योग्य त्या खोलीपर्यंत करता येते. हा नांगर हलक्या मध्यम व भारी जमिनीकरिता उपयुक्त आहे.

Rabi Season
Rabi Sowing : आजऱ्यात रब्बीचे क्षेत्र घटणार

ट्रॅक्टरचलित फुले बंदिस्त वाफे तयार करणारे अवजार

• रब्बी वारीसाठी जमिनीत पावसाचे पाणी मुरविण्यासाठी बंदिस्त वाफे उपयुक्त ठरतात. त्यांच्या निर्मितीसाठी हे अवजार वापरले जाते.

• ३५ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते.

• एका दिवसात ४ ते ४.५ हेक्टर क्षेत्रावर बंदिस्त वाफे तयार करता येतात.

ट्रॅक्टरचलित पॉवर हॅरो

• ४५ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालवता येते.

• पाती उभी असल्यामुळे जमीन दाबली जात नाही. जास्त खोलीवर पाती काम करतात.

• हलक्या, मध्यम व भारी जमिनीसाठी उपयुक्त

ट्रॅक्टरचलित डिस्क हॅरो

• ३५ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालवता येते.

• या यंत्राद्बारे जमीन लागवडीकरिता तयार करता येते.

• हलक्या, मध्यम व भारी जमिनीसाठी उपयुक्त

ट्रॅक्टरचलित मल्चिंग यंत्र

• या यंत्रासाठी ३५ ते ५५ अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आवश्यक आहे.

• गादी वाफे तयार करणे व आकार देणे.

• प्लॅस्टिक कागद व ठिबक पाइप तसेच खते जमिनीवर पसरविण्यास मदत करते.

• योग्य अंतरावर छिद्रे पाडता येतात.

बैलचलित ज्योती बहुपीक टोकण यंत्र (मफुकृवि, राहुरी)

• हे यंत्र एक बैलजोडीच्या साहाय्याने चालणारे आहे. या यंत्राद्वारे भुईमूग, सूर्यफूल, करडई, वारी, मका, हरभरा, तूर इ. पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते.

• दाणेदार खतांची मात्रा शिफारशीनुसार बियाण्याच्या बाजूला देता येते.

• या यंत्राची कार्यक्षमता १ ते १.५ हे. प्रति दिवस इतकी आहे.

Rabi Season
Village Farmer : बैलाची रिकामी दावण पोळ्याला डचत राहते

ट्रॅक्टरचलित ज्योती बहुपीक टोकण यंत्र

• या यंत्राद्वारे भुईमूग, सूर्यफूल, करडई, वारी, मका, हरभरा, तूर इ. पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते.

• दाणेदार खतांची मात्रा शिफारशीनुसार बियाण्याच्या बाजूला देता येते.

• शिफारशीप्रमाणे २ ओळींतील आणि दोन रोपांतील योग्य अंतर राखता येते.

• मिश्र पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते.

ट्रॅक्टरचलित फुले बहुपीक टोकण यंत्र

• या यंत्राद्वारे भुईमूग, सूर्यफूल, करडई, वारी, सोयाबीन, हरभरा, तूर इ. पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते.

• दाणेदार खतांची मात्रा शिफारशीनुसार बियाण्याच्या बाजूला देता येते.

• दोन ओळींतील आणि दोन रोपांतील योग्य अंतर राखता येते.

• यंत्राची कार्यक्षमता १.२५ ते १.५० हेक्टर प्रति दिवस.

पॉवरटिलरचलित ज्योती बहुपीक टोकण यंत्र

• मका, भुईमूग, सूर्यफूल, करडई, वारी, सोयाबीन, हरभरा, तूर इ. पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते.

• दोन ओळीतील अंतर २२.५, ३० अथवा ४५ सें.मी. राखता येते.

• यंत्राची कार्यक्षमता ०.७५ ते १.०० हेक्टर प्रति दिवस.

बैलचलित बहुउद्देशीय फुले शेती अवजार

• वारी, सूर्यफूल, करडई, वारी, सोयाबीन, हरभरा, तूर, मका इ. पिकांची पेरणी करता येते तसेच कुळवणी व फणणीसुध्दा करता येते.

• दोन ओळीतील अंतर ३० ते ४५ सें.मी.

• यंत्राची कार्यक्षमता २.३३ हेक्टर प्रति दिवस.

Rabi Season
Crop Insurance : शेतकऱ्यांना मिळेना भरपाई; तुपकरांचे ठिय्या आंदोलन

ट्रॅक्टरचलित फुले सरी वरंबा बहुपीक टोकण यंत्र

• या यंत्राद्वारे भुईमूग, सूर्यफूल, करडई, वारी, मका, हरभरा, तूर इ. पिकांची सरी वरंबा टोकण पद्धतीने पेरणी करता येते.

• सरीच्या दोन्ही बाजूंना टोकण पद्धतीने बियाण्याचीं पेरणी करता येते. सरीच्या अंतरानुसार लागवडीचे अंतर बदलता येते.

• यंत्राची कार्यक्षमता ०.४५ ते १ हेक्टर प्रति तास.

ट्रॅक्टरचलित रुंद वरंबा सरी टोकण यंत्र (बीबीएफ)

• ४५ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालवता येते.

• या यंत्राद्वारे भुईमूग, सूर्यफूल, करडई, हरभरा, वारी, मका, गहू, तूर इ. पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करता येते.

• दाणेदार खतांची मात्रा शिफारशीनुसार बियाण्याच्या बाजूला देता येते.

• गरजेनुसार कमी जास्त खोलीवर बियाची टोकण करता येते.

• या यंत्राच्या साह्याने २.८ कि.मी. प्रति तास वेगाने ०.४६ क्षेत्रावर एका तासात सरी वरंबा तयार करून बियांचे टोकण करता येते.

ट्रॅक्टरचलित फुले ऊस रोपे पुनर्लागवड यंत्र

• ४५ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते

• एका दिवसात २.७५ ते ३.०० हेक्टर क्षेत्रावर ऊस रोपांची पुनर्लागवड करता येते.

• पारंपरिक पद्धतीपेक्षा खर्चात ६० ते ७० टक्के बचत होते

• पारंपरिक पद्धतीपेक्षा वेळेत ७० ते ८० टक्के वेळेची बचत.

ट्रॅक्टरचलित दोन ओळींमध्ये चालणारा फॉरवर्ड रिव्हर्स रोटाव्हेटर

• ऊस पिकाच्या आंतरमशागतीसाठी उपयुक्त.

• फॉरवर्डमध्ये आंतरमशागतीचे काम होते. तर रिव्हर्समध्ये उसाला आतील बाजूस मातीची भर घालता येते.

• हे यंत्र ४ ते ५ फूट रुंद सरीत सहजपणे चालू शकते.

सायकल कोळपे

• यामध्ये तीन छोटे फण माती व तणाची मुळे ढिले करण्यासाठी बसविलेले असतात.

• हे यंत्र खुरपणी व आंतरमशागत, दोन ओळींतील निंदणी करण्यासाठी वापरण्यात येते.

• एक दिवसात एका माणसाच्या साह्याने ०.१५ ते ०.२० हेक्टर क्षेत्रावर कोळपणी करता येते.

Rabi Season
Agri Tourism : विषमुक्त शेतीतून कृषी पर्यटनाला आधार

पॉवर विडर

• या यंत्राला स्वतंत्र रोटाव्हेटर आहे.

• पिकातील तण काढण्यासाठी उपयुक्त आहे.

• चक्राकार गतीने फिरणारी पाती असल्यामुळे तण निर्मूलन प्रभावीरीत्या करता येते.

• या यंत्राद्वारे फळबागेतील खोडाभोवतीचे तण निर्मूलन प्रभावीपणे करता येते.

ट्रॅक्टरचलित थ्री-रोविडर

• ४५ व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालवता येते.

• या यंत्राला स्वतंत्र्य रोटाव्हेटर आहे.

• एकाचवेळी तीन ओळींतील तण काढण्यासाठी उपयुक्त आह

• चक्राकार गतीने फिरणारी पाती असल्यामुळे तण निर्मूलन प्रभावीरीत्या करता येते.

डॉ. तुळशीदास बास्टेवाड, ०२४२६-२४३२१९

(प्राध्यापक व प्रमुख संशोधक, अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com