Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Rake Point : सावद्याचा खत रॅक पॉइंट कार्यरत होईना

Rake Point Update : सावदा (ता. रावेर) येथील रेल्वे स्टेशनवर रासायनिक खतांचा मालधक्क्याला सुमारे चार वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. पण तरी खंतांचा रॅक रिकामा करण्याची सुविधा किंवा रॅक पॉइंट उभारलेला नाही.

Team Agrowon

Jalgaon News : सावदा (ता. रावेर) येथील रेल्वे स्टेशनवर रासायनिक खतांचा मालधक्क्याला सुमारे चार वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. पण तरी खंतांचा रॅक रिकामा करण्याची सुविधा किंवा रॅक पॉइंट उभारलेला नाही. हा रॅक पॉइंट उभारला जावा, अशी मागणी खत विक्रेते, विविध संघटना करीत आहेत.

मागील वर्षी जुलै, ऑगस्ट महिन्यात रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, भुसावळ, बोदवड या तालुक्यात रासायनिक खतांची मोठी टंचाई निर्माण झाली होती. या खतांच्या टंचाई मधून बाहेर निघण्यासाठी सावदा रेल्वे स्टेशन येथे रासायनिक खतांचा रॅक रिकामा करण्याची सुविधा किंवा रॅक पॉइंट तयार करावा, अशी मागणी शेतकरी व खते बियाणे विक्रेते, वितरक असोसिएशनच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, रेल्वेचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडे करण्यात आली होती.

यानंतर रॅक पॉइंट मंजूर झाला. लोकप्रतिनिधींनी याबाबत माहिती दिली. पण रॅक पॉइंट प्रत्यक्षात सुरू झालेला नाही. मागील तीन हंगाम शेतकरी या रॅक पॉइंटवर खते येतील, वॅगन थांबतील, अशी मागणी करीत आहेत. परंतु खते उतरण्याची सुविधा नाही.

हा रॅक पॉइंट सुरू झाल्यास केळी पट्टा व खतांची मोठी उचल करणाऱ्या रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, बोदवड या तालुक्यांना लाभ होईल. जळगाव जिल्ह्यात खतांची मागणी राज्यात अधिक आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल, मुक्ताईनगर या भागात खतांचा अधिक वापर केला जातो. जळगाव जिल्ह्यात खतांचा जेवढा वापर केला जातो, त्यातील 65 टक्के खतांचा वापर एकट्या रावेर. यावल, चोपडा, मुक्ताईनगर या केळीपट्ट्यात होत आहे.

सावदा येथील रॅक पॉइंट चोपडा, रावेर, यावल, मुक्ताईनगर या तालुक्यांसाठी सोईचा आहे. या रॅक पॉइंटवरून खतांची वेळेत ने-आण, वितरण, पुरवठा या भागात करता येईल. कृत्रीम टंचाई दूर होवू शकेल. सध्या जळगाव येथील रॅक पॉइंटवरून या तालुक्यांमधील खत वितरक, विक्रेत्यांना खते आणावी लागतात. त्यात अधिकचा वेळ जातो. वितरण, पुरवठ्यासंबंधी अडचणी येतात.

यंत्रणांचा अभाव

सावदा व लगत मोठे गोदाम नाहीत. तसेच वाहतूक व्यवस्थेची व्याप्ती हवी तशी नाही. खतांचा रॅक मालधक्क्यावर आल्यानंतर तो निश्चित कालावधीत रिकामा होईल, याची शाश्वती नाही. कारण तेवढी मागणी, पाठवून याची व्यवस्था नाही. यामुळेदेखील या रॅक पॉइंटबाबत अंतिम कार्यवाही होत नसल्याची माहिती एका खत विक्रेत्याने दिली.

खतांची मागणी नसल्यास ती वाहतूक व्यवस्था गतिमान करून लागलीच गोदामात पाठविता येतात. परंतु या भागात गोदामांची मोठी व्यवस्था नसल्यानेही अडचण आहे. यामुळे निश्चित कालावधीत रॅक रिकामा करून पुढील भुर्दंड बसणार नाही, याबाबतही ठोस कार्यक्रम नसल्याने हा रॅक पॉइंट प्रलंबित असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT